बापरे ! एकाच रात्री एकाच परिसरात सहा घरफोड्या 

1203
  • २ लाख रोख, १० तोळे सोने आणि २ दुचाक्या घेऊन चोरटे पसार
  • वरोरा शहरात चाल्लय काय?
  • वरोरा पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह 
  • गुन्हे शोध पथक नावापुरतेच 

वरोरा

.          वरोरा शहरातील गिरीविहार नगर मध्ये एकाच रात्री सहा जणांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून चोरट्यानी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली. यात चोरट्यानी २ दुचाकी, १० तोळे सोने व २ लाख रुपये रोख रक्कमेवर ताव मारल्याने परिसरात खळबळ माजली आहे. घरफोड्या च्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वरोरा पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असुन वरोरा पोलिसांचा गुन्हे शोध पथक नावापुरताच उरला आहे.

.         चंद्रपूर नागपूर महामार्गांवरील बोर्डा ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या गिरीविहार नगर परिसरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. येथील प्रकाश गणवीर व त्यांचे कुटुंब झोपले असताना . घरातील मागच्या बाजूच्या खिडकीचे ग्रील तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला व कपाटातील दोन लाख रुपये व दहा तोळे सोन्यावर ताव मारत गणवीर यांच्या घरासमोरील संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. अविनाश चिडे यांचीही दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. तर आशिष दुधे यांच्या गेटचे कुलूप तोडून दुचाकी चोरली व काही अंतरावर दुचाकी सोडून पसार झाले. तर ग्रामविकास अधिकारी अजय कटाईत यांच्या घरच्या गेटचे कुलूप तोडून हिरो स्मार्ट दुचाकी वाहन (क्रमांक एमएच ३४, एक्यू २६११) चोरून नेले. गजानन नवघरे यांच्या गेटचे कुलूप तोडून दुचाकी (क्रमांक एमएच- ३४, एएन- ६९१३) चोरून नेली. वरोरा शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घरफोडीच्या घटनेत वाढ होताना दिसून येते. यावर अंकुश लावण्यासाठी गुन्हे शोध पथकाची वेगळी शाखा निर्माण करण्यात आली मात्र याकडे या शाखेचे कमालीचे दुर्लक्ष होतांना दिसत असल्याने या शाखेकडे नेमकी कोणती जबाबदारी सोपविण्यात आली असा सवाल आता नागरिक करतांना दिसत आहे. तर वारंवार होत असलेल्या या घटनांमुळे वरोरा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते