भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
वरोरा : महाकवी वामनदादा कर्डक विचार मंच वरोऱ्याच्या वतीने बुद्ध पौर्णिमा व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. २५ रोजी स १० वाजता नगर भवन वरोरा येथे खुली बुद्ध भीम गीत गायन स्पर्धा व निमंत्रितांचे भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा नयोमी साटम (भापोसे) यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षा वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वरोरा केशव ठमके, माजी नगराध्यक्ष न.प वरोरा अहेतेशाम अली, नगरसेवक न. प भद्रावती सुशील देवगडे, (वंचित बहुजन आघाडी ) जिल्हाध्यक्ष, ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर राजेश सोलापण, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा राजू चिकटे,अध्यक्ष -वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र( राकाँ) विलास नेरकर, शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख (उबाठा ) मुकेश जीवतोडे, प्रदेश सचिव -भाजपा युवा मोर्चा वरोरा करण देवतळे, सामाजिक कार्यकर्त्या सुशीला भगत आलापल्ली हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
. प्रथम सत्रामध्ये खुली बुद्ध- भीम गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे सूत्रसंचालन हेमंत शेंडे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक चंद्रपूर हे करणार असून दुसऱ्या सत्रामध्ये धारदार कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कवी संमेलनाचे अध्यक्ष ईसादास भडके, महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक व ज्येष्ठ कवी चंद्रपूर, विशेष अतिथी शोभा वेले, कवयित्री नागपूर हे उपस्थीत राहणार असून या कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन नरेंद्र सोनारकर, विद्रोही कवी बल्लारपूर हे करणार आहेत. आणि शेवटच्या पर्वामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सत्कार करण्यात येत आहे. यामध्ये दशरथ शेंडे, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते वरोरा, किरण साळवी, व्हर्चुअस बहुउद्देशीय संस्था भद्रावती, चेतन शर्मा, सामाजिक कार्यकर्ते वरोरा, वंदना मून, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या वरोरा, अशोक गुरुवाले, सामाजिक कार्यकर्ते चंद्रपूर यांचा समावेश आहे.
. सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक सुनिल शिरसाट, अमर गोंडाणे, हितेश राजनहिरे, भीमराव शेंडे, सागर ढोके, पुष्पा साठे, निलेश वानखेडे, उषा मून, मेघा भालेराव, योगेश खोब्रागडे यांनी केले आहे.


