Home शैक्षणिक कर्नाटक शासनाकडून 2024 चे सर्वोत्कृष्ट युवक पत्रकारिता पुरस्कार जाहीर

कर्नाटक शासनाकडून 2024 चे सर्वोत्कृष्ट युवक पत्रकारिता पुरस्कार जाहीर

2271

महाराष्ट्रातील प्रतीक लांबट या युवक पत्रकाराचा सन्मान

चंद्रपुर : पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी कर्नाटक शासनाच्या वतीने दिले जाणारे 2024 वर्षासाठीचे युवक पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये चंद्रपूरतील प्रतिक लांबट याला पुरस्कार मिळाला आहे. मंगरूळ मध्ये विधान भवन परिसरात राज्यपाल गहलोत यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. प्रतीक लांबट याला सर्वोत्कृष्ट युवक पत्रकार सर्वोत्कृष्ट लेखक वलैकिक समानता शिक्षण आरोग्य जनजागृती माध्यम जागृती व तीन लाख रुपये मानचिन्ह देऊन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

.       2023 च्या निवडीसाठी माहिती व जनसंपर्क संचालनालय भारत सरकार समितीकडून ही निवड करण्यात आली होती. एमजीएम विद्यापीठांमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेला चंद्रपूरचा प्रतिक लांबट चमकला. महाराष्ट्रातील एकमेव तरुण पत्रकाराला तीन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. भारतातील कानाकोपऱ्यातील लक्षणीय कामगिरी करणाऱ्या युवक पत्रकाराला दरवर्षी हा पुरस्कार देऊन कर्नाटक शासन गौरव करतो.

.       यावेळेस या पुरस्कार सोहळ्यास कर्नाटकाचे राज्यपाल मुख्यमंत्री तथा सुधा मूर्ती व इतर वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर पत्रकारितेतील नामवंत रविष कुमार, अन्न गोस्वामी, रजत शर्मा, अंजन ओम कश्यप सह भारतातील विविध पत्रकारांची उपस्थिती होती. मात्र सर्वांना पछाड चंद्रपूरचा प्रतीक लांबट या सोहळ्यात चमकला. याबरोबर हा पुरस्कार घेताना त्याच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. यावेळेस प्रतिक ने सांगितले की या पुरस्काराचे श्रेय माझ्या कुटुंबाला, शिक्षकाला आणि माझ्या मित्राला आणि, ज्यांनी ज्यांनी त्याला पाठिंबा दिला व त्याला मार्गदर्शन केले, त्याने हा पुरस्कार त्यांच्या नावी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील तो एकमेव तरुण आहे की, त्याला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट युवक पत्रकार पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले आहे.

error: Content is protected !!