Home सामाजिक मोटेगाव येथे तीन बोरवेल्सचा लोकार्पण सोहळा संपन्न

मोटेगाव येथे तीन बोरवेल्सचा लोकार्पण सोहळा संपन्न

1227
  • सरपंच, उपसरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण 

नेरी : नेरीवरून जवळ असलेल्या मोटेगाव येथे ग्रामपंचायत च्या वतीने पाण्याची भीषण टंचाई निर्माण होत असलेल्या तीन प्रभागात 15 व्या वित्त आयोगातून तीन बोरवेल्स चे निर्माण करण्यात आले. या बोरवेल्सचे लोकार्पन सरपंच, उपसरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

.        मोठेगाव येथे तीन प्रभागात  पाण्याची भीषण टंचाई निर्माण होत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मागणी वरून ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन 15 व्या वित्त आयोगा च्या निधीतून तीन बोरवेल्स निर्माण करण्यात आले. यात झोडे वार्डात जिल्हा परिषद शाळेसमोर  तर तिसरी बोरवेल्स बंडू पाटील यांच्या घरासमोर मारण्यात आले.

.        या लोकार्पण सोहळ्याला सरपंच सुभाष नेवारे, उपसरपंच चंद्रभान रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अजित सुकारे, संगम बोरकर, दशरथ रामटेके, रामकृष्ण झोडे, काशिनाथ झोडे, हरीचंद्र रामटेके, श्रीराम झोडे आदीसह गावकरी महिला पुरुष उपस्थित होते.

error: Content is protected !!