- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुढाकार
मुल : समाजातील गोरगरीब वंचित घटकाची सेवा करत समाजकार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांच्या कार्याची दखल घेत महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुलच्या वतीने आज शुक्रवारला महिलांच्या घरी जाऊन साडी चोडी देत त्यांचा सत्कार करण्यात आला.
. यावेळी मुलच्या नव्यानेच रुजू झालेल्या तहसीलदार मृदुला मोरे यांचाही सावित्रीबाई फुले यांचा फोटो देत सत्कार करण्यात आला. त्यासोबतच तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा वर्कर तसेच महिला पत्रकार कुमुदिनी भोयर यांच्या घरी भेट देत साडीचोळी देऊन त्यांच्या कार्याची दखल घेत सत्कार करण्यात आला.
. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पक्षाचे तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, शहर अध्यक्ष आकाश येसनकर, महिला तालुका अध्यक्ष संगीता गेडाम, युवक तालुका अध्यक्ष रोहित कामडे, महिला शहर अध्यक्ष धाराताई मेश्राम, तालुका उपाध्यक्ष महेंद्र कोडापे, वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका अध्यक्ष आनंदराव गोहने, सोशल मीडिया चे प्रमुख भावेश रामटेके, रोजगार आघाडीचे मुलं शहर प्रमुख रजत कुकुडे, अल्पसंख्यांक चे शहर अध्यक्ष आशु खान, सुवर्णा रामटेके, माला शेंडे, रंजना सुखदेवे, सूरज गिरडकर, साहिल खोब्रागडे, प्रणय रायपुरे, रोहित शेंडे, आदित्य गेडाम, दिपक लांबूवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.


