जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली इस्त्रो अंतराळाची महायात्रा

380

 अंबुजा सिमेंट फाउंडेशन चा पुढाकार 

कोरपना : अंबुजा विद्या निकेतन उप्परवाही येथे दि. २५ फेब्रुवारी रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने इस्त्रो अंतराळ महायात्रेचे आयोजन बसच्या माध्यमातून करण्यात आले होते. सदर यात्रा जिल्हा परिषद शाळांचा विद्यार्थ्यांनी अनुभवली.

.       अंबुजा सिमेंट फाउंडेशन च्या माध्यमातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोयगाव, कवठाळा, लखमापूर, उप्परवाही, मंगी (बु), थुट्रा, हरदोना( खु), पिंपळगाव, सोनापुर, भेंडवी येथील विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन करत अंतराळ महायात्रेच्या माध्यमातून अवकाशात सोडण्यात येणाऱ्या विविध क्षेपनास्त्राबाबत या ठिकाणी विद्यार्थ्यांना बस च्या माध्यमातून माहिती देण्यात आली. तसेच या प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा, पोस्टर स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान विषयक माहिती दर्शविणारे विविध फलक याठिकाणी लावलेले होते. ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक माहिती देण्यात आली.

.       या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी सचिनकुमार मालवी, अंबुजा निकेतन चे प्राचार्य राजू शर्मा, अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे विभागीय व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे, शिक्षण विभाग समन्वयक सरोज अंबागडे, अंबर त्रिवेदी, गोपाळ बुरघाटे, गिरिधर पानघाटे, उमेश आडे, मोरेश्वर कारेकर, शोभना खैरे, निलेश कुमरे, तृप्ती टिकले, नरेश मंडोगडे, सुधाकर जाधव, सुरेश आत्राम, बाळकृष्ण गावंडे, अनिकेत दुर्गे, चैताली कन्नाके यांच्यासह अंबुजा विद्या निकेतन चे सर्व शिक्षक, कर्मचारी, अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे कार्यकर्ते, पुस्तकपरी व विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते.