29 फेब्रुवारीपर्यंत ईच्छुक खरेदीधारकांकडून दरपत्रक आमंत्रित
चंद्रपूर : उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथील रुग्णालयीन निर्लेखीत उपकरणे व जडसंग्रह साहित्याचे स्थानिक स्तरावर दरपत्रके मागवून जाहीर लिलाव करण्यात येत आहे. सदर निर्लेखनपात्र जडसंग्रह साहित्याची किंमत 37 हजार 553 तर निर्लेखनपात्र उपकरणांची किंमत 61 हजार 844 ठरविण्यात आली आहे.
. खरेदीधारकांनी आपले दरपत्रक ठरविलेल्या किंमतीपेक्षा ज्या खरेदीधारकांचे दर जास्त असेल त्याच खरेदीधारकास सदर साहित्य व उपकरणे देण्यात येतील. ईच्छुक खरेदीधारकांनी आपले दरपत्रक बंद लिफाफ्यासह दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथील कार्यालयात सादर करावेत. असे वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी कळविले आहे.