Home चंद्रपुर जिल्हा विशेष होणाऱ्या नवरीने मागितली पेमेंट स्लीप, नवरोबाने केली आत्महत्या

होणाऱ्या नवरीने मागितली पेमेंट स्लीप, नवरोबाने केली आत्महत्या

1260

कर्नाटका कंपनी कडून कामगारांची थट्टा

कंपनी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मृतकाच्या नातेवाईकांची मागणी

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एमटा कंपनीमध्ये काम करीत असलेल्या कामगारांचे लग्न जुळले. लग्न जुळल्या नंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. दोघात बोलणे सूरू झाले. आणि होणाऱ्या नवऱ्या मुलीने होणाऱ्या नवरोबाला पेमेंट स्लीप मागितली. मात्र कंपनी कडून पेमेंट स्लीप मिळत नसल्याने आता आपले लग्न तुटणार आणि बदनामी होणार या भीतीने बोहल्यावर चढायच्या आधीच जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना भद्रावती तालुक्यातील सुमठाणा येथे घडली. अमर कांबळे असे मृतक युवकाचे नाव आहे.

.         भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एमटा कंपनीत मागील काही वर्षांपासून सुमठाणा येथील अमर कांबळे हा कामगार म्हणून काम करत होता. तालुक्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक युवक जो मिळेल तो रोजगार करतात. आपली नौकरी टिकविण्यासाठी कंपनी अन्याय करत असली तरी नोकरीं वाचविण्यासाठी कामगार आवाज उचलताना दिसत नाही. नौकरी नाही तर छोकरी नाही. अशी परिस्थिती सध्या आजच्या युवकांवर ठेपली आहे. अशातच अमर चे लग्न जुळले. लग्न जुळल्यानंतर होणाऱ्या नवरा बायको मध्ये बोलायला सुरवात झाली. आणि होणाऱ्या बायकोने त्याला तुम्हाला खरंच किती पगार आहे. असे विचारत पेमेंट स्लीप दाखवा अशी मागणी केली. अमर ने ही तिचे ऐकत कंपनीला आपली पेमेंट स्लीप देण्याची विनंती केली मात्र कंपनीने पेमेंट स्लीप देण्यास नकार दिला. कंपनी पेमेंट स्लीप देत नाही म्हणजे आता आपले लग्न तुटणार. लग्न तुटणार म्हणजे बदनामी होणार या भीतीने अखेर अमर ने जीवनयात्रा च संपविण्याचा निर्णय घेत हतबल झालेल्या अमर कांबळे यांनी राहत्या घरी सुमठाणा येथे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

.         अमर कांबळे याला चार बहिणी असून आई विधवा आहे. घराची संपूर्ण जबाबदारी असलेल्या अमर ने आत्महत्या केल्याने संपूर्ण कुटुंबावर संकट कोसळले आहे. केपीसीएल व कर्नाटका एमटा या कंपनी ने कामगारांना किमान वेतन दिले नाही व कामगारांना पेमेंट स्लिप मिळत नाही त्यामुळे अमर कांबळे यांच्या आत्महत्तेला कंपनी जबाबदार असल्याने कंपनी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतकाच्या कुटुंबाला 20 लाख रुपये मोबदला देण्यात यावा व परिवारातील सदस्यांना नौकरी देण्यात यावी अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी प्रशासनाला केली आहे

error: Content is protected !!