Home सामाजिक प्रियदर्शनी कॉन्व्हेंटच्या चिमुकल्यांच्या नृत्यविष्काराने रिझविले

प्रियदर्शनी कॉन्व्हेंटच्या चिमुकल्यांच्या नृत्यविष्काराने रिझविले

1159

विविध गीतावर चिमुकले थिरकले

पाल्याच्या कलविष्कारावर पालक झाले मंत्रमुग्ध

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील प्रियदर्शनी कॉन्व्हेंटचा वार्षिक सांस्कृतिक सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचावर नुकताच पार पडला. सांस्कृतिक कार्यक्रम दरम्यान चिमुकल्यांनी एका पेक्षा एक सरस नृत्य कलेचे सादरीकरण केले. आपल्याच पाल्यांचा कलविष्कार पाहून पालक देखील मंत्रमुग्ध झाले. विविध गीतांच्या तालावर व नृत्यावर चिमुकले चांगलेच थिरकले. प्रियदर्शनी कॉन्व्हेंटच्या चिमुकल्यांनी नृत्यविष्काराने प्रेक्षकांना रिझविले.

.        विसापूर येथील प्रियदर्शनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मागील १५ वर्षांपासून प्रियदर्शनी कॉन्व्हेंट स्कूल सुरु आहे. या कॉन्व्हेंटचा सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाट्न सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक देवराव चणेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, डॉ.अश्विनी कांबळे, शिक्षक साधना टोंगे, वसुधा व्याहाडकर, शाळेच्या प्राचार्य रंजना येलमुले, आनंदा कांबळे, स्वाती टोंगे, गेडाम, चणेकर यांची उपस्थिती होती.

.        दरम्यान शाळेतील चिमुकल्यांनी देशभक्ती, गोंडी, लावणी, महापुरुषांच्या गीतावर पद लालित्यपूर्ण नृत्याविष्कार करून चांगलेच रिझविले. बालकांनी सादर केलेली प्रबोधनात्मक नाटिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. तीन वर्षांपासून पाच वर्षांच्या बालकांची कलविष्कार पालकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रंजना येलमूले यांनी केले. संचालन स्वाती टोंगे यांनी, तर आभार प्रदर्शन आनंदा कांबळे यांनी केले.

error: Content is protected !!