शिवगर्जनेने दुमदुमली नंदोरी नगरी
■ चिमुकल्याणी साकारल्या जिजाऊ, शिवाजी, मावळ्यांच्या प्रतिकृती
■ शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
■श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान नंदोरीचा उपक्रम
चंद्रपुर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान नंदोरीच्या वतीने १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. १९ फेब्रुवारी रात्री नंदोरी गावातून मिरवणूक काढण्यात आली. यात अनेक चिमुकल्यांनी माता जिजाऊ, शिवाजी महाराज व मावळ्यांची प्रतिकृती करीत शिवगर्जना देत नंदोरी गाव दुमदुमले होते.
. 17 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्घाटन सोहळाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती भद्रावती चे माजी सभापती प्रवीण ठेंगणे होते तर उद्घाटक म्हणून ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे उपस्थित होते व प्रमुख पाहुणे पंचायत समिती भद्रावती चे माजी सभापती धनराज विरुटकर, ग्राम पंचायत नंदोरी चे सरपंच मंगेश भोयर, ग्राम पंचायत नंदोरी च्या उपसरपंच उषा लांबट, ग्राम पंचायत नंदोरी चे माजी सरपंच शरद खामणकर, श्री. छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष भानुदास ढवस, उपाध्यक्ष स्वप्नील लांबट, बालाजी जिवतोडे, प्रा. रवी जोगी, ग्राम पंचायत नंदोरी चे सदस्य अजित पुसनाके, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्लेषा जिवतोडे भोयर उपस्थित होते. 18 फेब्रुवारीला सायंकाळी 8 वाजता ह.भ.प. माऊली महाराज जाहूरकर यांचे भव्य किर्तनाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे, शिवसेना (उबाठा) विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, भाजपा विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर, राष्ट्रवादी कोंग्रेस विधानसभा प्रमुख विलास नेरकर, शिवसेना विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, गजानन उताने व माजी सैनिकांनी उपस्थिती दर्शवली होती.
. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी पंचायत समिती भद्रावतीचे माजी सभापती प्रवीण ठेंगणे होते तर प्रमुख पाहुणे भारतीय जनता युवा मोर्चा चे प्रदेश सचिव करण देवतळे, नगर परिषद वरोरा चे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, युवा प्रतिष्ठान नंदोरी चे अध्यक्ष भानूदास ढवस, युवा प्रतिष्ठान नंदोरी चे उपाअध्यक्ष स्वप्नील लांबट, ग्राम पंचायत नंदोरी चे सरपंच मंगेश भोयर, ग्राम पंचायत नंदोरी च्या उपसरपंच उषा लांबट,दैनिक नवजीवन चे जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, ग्राम पंचायत नंदोरी चे सदस्य शरद खामणकर, किशोर उमरे, अजित पुसनाके, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्लेषा जिवतोडे भोयर, शाळा व्यवस्थापन समिती नंदोरी चे अध्यक्ष घनश्याम ढवस, प्रज्वल एकरे, उपस्थिती दर्शवली होती.
या शिवजयंती निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १७ फेब्रुवारीला सकाळी 6 ते 7 स्वच्छता अभियान, दुपारी 12 ते 1 निबंध स्पर्धा, सायंकाळी 6 छत्रपती शिवाजी महाराज उद्घाटन सोहळा, रात्रो 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, 18 फेब्रुवारीला सकाळी 6 ते 7 वाजता स्वच्छता अभियान, सकाळी 10 ते 12 वाजता वृक्षारोपण, सायंकाळी 5 ते 7 सेवा निवृत्त माजी सैनिकांचा सत्कार, रात्रो 8 वाजता ह.भ.प. माऊली महाराज जाहूरकर यांचे भव्य किर्तन, १९ फेब्रुवारीला सकाळी 6 ते 7 स्वच्छता अभियान, दुपारी 12 ते 3 रांगोळी स्पर्धा, दुपारी २ ते ५ वाजता भव्य रक्तदान शिबीर, सायंकाळी 5 ते 9 छत्रपती शिवाजी महाराज शोभायात्रा, रात्रो 9 ते 9.30 वाजता बक्षीस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवशीय स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती. या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान समिती नंदोरी तथा समस्त ग्रामवासीयांनी सहकार्य केले.