छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती रॅलीने विसापूर नगरी दुमदुमले

402

महाराष्ट्र गीतांनी व जय शिवरायांच्या घोषणेने रॅलीला प्रारंभ

महापुरुष व संतांच्या पुळ्यांना मालार्पण करून केले अभिवादन

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी चौक येथील छत्रपती शिवरायांच्या आश्वरूढ पुतळ्याला मालार्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.महाराष्ट्र गीत व जिजाऊ वंदना झाल्यानंतर रॅलीला प्रारंभ करण्यात आला. ढोल ताशाच्या निनाद,आश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा,जय जिजाऊ,जय शिवरायांचा जयघोष करत मिरवणूक मुख्य मार्गानी काढण्यात आली.दरम्यान गावातील महापुरुष व संताच्या पुतळ्यांना मालार्पण करून अभिवादन करण्यात आले.

.       छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर तोफेच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली.ही रॅली ग्रामपंचायत भवन समोर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन केले.ही मिरवणूक विसापूरची राणी चौक मार्गे मनोरंजन चौक,मिलन चौक मार्गानी रेल्वे चौकातील महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले चौकातील पुतळ्यांना मालार्पण करून अशोका बुद्ध विहार मार्गे इंदिरा नगर वार्डात आली.

.       विसापूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकातील श्री संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला मालार्पण करण्यात आले. रॅलीत शेकडोवर नागरिकांचा, तरुणांचा, भजन मंडळाचा सहभाग होता. रॅलीच्या मार्गादरम्यान ठिकठिकाणी सामाजिक मंडळाच्या वतीने रॅलीत सहभागी मावळ्यांसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या रॅलीचे सारथ्य छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल गौरकार, उपाध्यक्ष आकाश गिरडकर, सचिव दीपक ढेंगळे, सहसचिव कार्तिक ठुसे, पंकज गिरडकर, ललित टोंगे, योगेश निपुंगे,  अरुण टोंगे, सौरभ गिरसावळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले.