किशोर डुकरे यांचे आमरण उपोषण अखेर पाचव्या दिवशी सुटले,

74

चार मागण्या तूर्तास मान्य करीत असल्याचे तहसीलदारांचे आश्वासन

तहसीलदारांनी उसाचा रस पाजून आमरण उपोषण मागे

वरोरा : शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांना घेऊन 12 फेब्रुवारीला शेतकरी किशोर डुकरे वरोरा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषणाला बसले होते. अखेर पाचव्या दिवशी किशोर डुकरे यांच्या आंदोलनाची  दखल तहसीलदार योगेश कोटकर यांनी घेतली. त्यांनी आज शुक्रवारी दि. 16 ला  दुपारी एक वाजताच्या सुमारास उपोषण मंडपाला भेट देऊन किशोर डुकरे यांनी केलेल्या मागण्यांपैकी चार मागण्या तूर्तास मान्य करीत असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तहसीलदार वरोरा यांच्या हस्ते निंबू पाणी देऊन उपोषनाची सांगता करण्यात आली.

.          मागील पाच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्या शासन दरबारी सोडवल्या जाव्या व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी वरोरा तहसील कार्यालयात आमरण उपोषण सुरू केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक कार्यकर्ते विशाल देठे यांच्या माध्यमातून मुंबई येथील महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य सरचिटणीस आरिफ शेख, अनिल झळेकर, पोपटराव जानकर,  उपाध्यक्ष सुधीर खापने हे चंद्रपूर च्या दौऱ्यावर असताना त्यांनी किशोर डुकरे यांच्या आंदोलनाला भेट देऊन स्थानिक तहसीलदार यांच्याशी चर्चा केली व आपण तालुक्याचे एक जिम्मेदार अधिकारी म्हणून या आंदोलनाला गंभीरपणे का घेत नाही हा सवाल करून तात्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना करा अशी मागणी केली.

.          यावेळी ओरिएंटल विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी भ्रमणध्वनीवरून इशारा देत जर उद्या विमा कंपनीचा प्रतिनिधी उपोषण मंडपात दिसला नाही तर तुझ्यासह तुझ्या कंपनीचे कार्यालय फोडल्या जाईल असा इशारा दिला होता,  त्यामुळे प्रशासनाची चक्रे फिरायला लागली आणि किशोर डुकरे यांच्या उपोषण स्थळी तहसीलदार कृषी अधिकारी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी आज दिनांक 16 फेब्रवारी ला उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात झालेला घोळ लवकरच दुरुस्त करून शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात पैसे टाकल्या जाईल असे आश्वासन दिले, या सोबतच पांदन रस्ते आणि सातबारा फेरफार संदर्भातील प्रश्न लवकरच मार्गी लावल्या जाईल असे लेखी आश्वासन तहसीलदार यांच्याकडून मिळाल्यानंतर किशोर डुकरे यांना तहसीलदार योगेश कौटकर यांनी उसाचा रस पाजून आमरण उपोषण आज दुपारी 12.30 च्या दरम्यान मागे घेतले, दरम्यान आज प्रशासनाने काही मागण्या मान्य केल्या पण त्यांची पूर्तता जर एका महिन्यात झाली नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी प्रशासनाला दिला.

.          यावेळी तहसीलदार कौटकर, नायब तहसीलदार काळे, कृषी तालुका अधिकारी, ओरिएंटल विमा कंपनीचे प्रतिनिधी व पोलीस अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, योगेश खामकर, मनसेचे ‌राजू कुकडे, या आंदोलनाला सहभागी शेतकरी, बंडू देऊरकर, मारोती मोरे, सुरेंद्र  देठे, पुष्पाकर खेवले, बबन खीरटकार, विशाल मोरे, तुकाराम निब्रड, अविनाश काळे, अविनाश पिंगे, संदीप वासेकर, श्रीकृष्ण देवतळे, आकाश धवणे, संदीप मते, शंकर निब्रड, विठ्ठल चौधरी, पंकज खामनकर, कमलाकर दारुंडे, महेश वराटकर, विशाल देठे, संदीप  झाडे, नितीन नागरकर, आदी शेतकऱ्यांनी आंदोलन यशस्वी करण्यास सहभाग दाखविला.