जगन्नाथ बाबा उप-बाजार समिती चंदनखेडा येथे इलेक्ट्रानिक वे-ब्रिज काटा चे लोकार्पण

35

भद्रावती : शेतकरी यांच्या हिताच्यादृष्टीने भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती अंतर्गत उप-बाजार समिती चंदनखेडा येथे 50 मेट्रीक टन इलेक्ट्रानीक वे-ब्रिज काटा यांचे शुक्रवारी सीडीसीसी बँक चंद्रपूरचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

.        भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती अंतर्गत तालुक्यातील चंदनखेडा येथे उप-बाजार समिती आवार आहे. शेतकरी यांच्या कृषी उपज मध्ये वजनाचे हेरफेर होवू नये तसेच योग्य वजनाचा लाभ मिळावा तथा शेतकऱ्यांच्या वेळेची बचत व्हावी या उदांत हेतुने भद्रावती कृ.उ.बा.स. सभापती व संचालक मंडळानी ईलेक्ट्रानीक वे-ब्रिज काटा बसविण्या संबंधाने निर्णय घेत सभापती भास्कर ताजणे यांच्यासह संचालक मंडळाच्या प्रयत्नाने ईलेक्ट्रानिक वे-ब्रिज काटयाचे काम पुर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांकरीता वजन काटयाचे आज लोकार्पण करण्यात आले.

.        या लोकार्पण कार्यक्रमास उद्घाटक म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूरचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजणे हे उपस्थिती होते. प्रमुख पाहुण्यामध्ये कृ.उ.बा.स. संचालक उप-सभापती अश्लेषा मंगेश भोयर, बांधकाम सभापती गजानन उताणे, मनोहर आगलावे, विनोद घुगुल, शरद जांभुळकर, कान्होबा तिखट, ज्ञानेश्वर डुकरे, शांताबाई रासेकर, परमेश्वर ताजणे, शामदेव कापटे, मोहन भुक्या, प्रविन बांदुरकर, राजेंद्र डोंगे, अतुल जिवतोडे, भानुदास गायकवाड, अनिल चौधरी, राजु आसुटकर आदी उपस्थित होते.