चिमूर : तालुक्यातील आंबोली येथील दुर्योधन चट्टे यांना गंभीर आजार असल्याने उपचारासाठी लागणाऱ्या पैशाची सोय करणं त्यांच्या कुटुंबाला अवघड झाले कारण कुटुंबातील प्रमुख स्वतः आजारी असल्याने उपचार व शस्त्रक्रियेची गरज असताना कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याने व्यवस्थित उपचार घेणे शक्य नव्हते याची संपूर्ण बाब राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजुकर यांना मिळताच आंबोली येथे जाऊन दुर्योधन चट्टे यांना उपचारासाठी आर्थिक मदत दिली.
. यावेळी चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन ढोक, सूर्यभान गरमडे, यशवंत टापरे, संजय लाखडे, सुधीर चट्टे, अंचल जांभूळे, मधुकर नागपुरे, इस्तारी चट्टे, रमेश चवरे, आत्माराम चट्टे, अमोल जांभूळे, अभिलाष भषाकर उपस्थित होते.