वरोरा : भारतीय बौद्ध महासभा शाखाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या आदेशानुसार गाव तिथे शाखा स्थापन करण्यात येत आहे. चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष आनंद वनकर, सचिव ज्ञानानंद शिंदे, भिमराव आमटे, गजानन मेंगलवार यांच्या अध्यक्षतेखाली, दि बुध्दीष्ठ सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा वरोरा ची “शिवली बुद्ध विहार टिळक वार्ड वरोरा येथे “तालुका कार्यकारिणी” गठित करण्यात आली. यात अशोक पांडुरंग देवगडे, यांची वरोरा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. व तालुका कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी यांना” नियुक्ती पत्र ” व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या विचारांने व त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली संकल्पना “बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करुन अन्यायाविरुद्ध लढा देऊन सामाजिक, आर्थिक अर्थ व्यवस्था न्याय, शैक्षणिक उच्च शिक्षण, समाजातील प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय” डॉ राजरत्न आंबेडकर यांनी घेतला आहे. तरी सर्व बौद्ध बांधव क्रांतीकारी युवक, युवती, महिला कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी मोठ्या संख्येने भारतीय बौद्ध महासभेच्या होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात तन, मन, धना, ने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन यावेळी तालुका अध्यक्ष अशोक देवगडे यांनी केले.


