जगन्नाथबाबा पालखी सोहळा भाविकांना भावला

401

टाळ मृदंगासह ४0 भजन मंडळाचा सहभाग

हडस्ती गाव जनगनाथबाबा गीताने दुमदुमले

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती येथील जगन्नाथबाबा देवस्थान समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जगन्नाथबाबा मुर्ती स्थापना दिवस व मारोती महाराज जन्म दिनाचा सोहळा दि. ८ व ९ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला. येथील जगन्नाथबाबा पालखी सोहळ्यात टाळ मृदंगासह तब्बल ४0 भजन मंडळी सहभागी झाले. मंगलमय वातावरणात निघालेल्या पालखी मिरवणुकीने व जगन्नाथबाबा गीतांच्या तालावर दुमदुमून गेले. अवघे हडस्ती गाव भाविकांनी भक्तीमय झाले.

.          बाल्लारपूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या हदस्ती गावात पहिल्या दिवशी गावकऱ्यांनी ग्राम स्वच्छता अभियान राबविले. घटस्थापना करून मंगलमय वातावरणात ह. भ. प. सुरपाम महाराज यांनी जगन्नाथ बाबा यांच्या भक्तिमय चरणी कीर्तन करून जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर मारोती महाराज यांच्या हस्ते पूजा अर्चना करून हवन करण्यात आले. दरम्यान पालखी मिरवणूक काढण्यात आली. गावात निघालेल्या पालखी मिरवणुकीने ग्रामीण संस्कृतिचे दर्शन घडविले. या मिरवणुकीत पंचक्रोशीतील तब्बल ४0 भजन मंडळ सहभागी झाले. येथील सोहळा सोहळ्यामुळे गावात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

.          यावेळी गावातील महिलांनी घराच्या दारासमोर रांगोळया काढून पालखीचे व भजन मंडळीचे भक्तीभावाने औक्षण केले. यामुळे गावाला जत्रेचे स्वरूप आले होते. दहीहंडी मारोती महाराज यांच्या हस्ते फोडण्यात आली. पालखी सोहळ्यात सहभागी भजन मंडळाचा गावकऱ्यांनी सत्कार केला. दरम्यान कीर्तनकार खेमराज महाराज, महेश महाराज, वामन महाराज, मोरधर महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून जगन्नाथबाबाचा व संतांचा महिमा कथन करून भाविकांना भक्तिरसात तल्लिन केले. महाप्रसाद कार्यक्रमाने जगन्नाथबाबा पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात आला. श्री.सद्गुरू जगन्नाथबाबा देवस्थान समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी तथा गावकऱ्यांनी सोहळा यशस्वी करण्यास सहकार्य केले.