कागदपत्रात शिथिलता करा
प्रशांत समर्थ यांची उपविभागीय अधिकारी याचेकडे मागणी
मुल : विमुक्त भटक्या जमातीमध्ये समाविष्ट लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त (घरकुल) वसाहत योजना सुरु केली. त्यासाठी शासनाने निधीही उपलब्ध करून दिला. मात्र कागदपत्राच्या जाचक अटी मुळे लाभार्थ्यांना कसरत करावी लागत असल्यामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल योजना कागदपत्राच्या कचाट्यात सापडली आहे.
. मुल तालुक्यातील जनसामान्य नागरिकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी मेश्राम यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत प्रशांत समर्थ यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त (घरकुल) वसाहत योजनेच्या लाभधारकांना कागदपत्रासाठी येणाऱ्या अडचणी मध्ये शिथिलता करण्याची मागणी केली.
. यशवंतराव चव्हाण मुक्त (घरकुल) वसाहत योजनेच्या माध्यमातून विमुक्त भटक्या जमातीमध्ये समाविष्ट लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त (घरकुल) वसाहत योजना सुरु केली. त्यासाठी मोठा निधीही शासनाने उपलब्ध करून दिला. पण घरकुल लाभधारकांना कागदपत्राची पूर्तता करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही अडचण लक्षात घेता मुलं नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी कागदपत्राची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तहसील कार्यालयात विशेष मोहीम राबविण्याची मागणी केली.
. यावेळी उपविभागीय अधिकारी मेश्राम, मुलं च्या तहसीलदार मृदुला मोरे, पालकमंत्री मुनगंटीवार याचे ओ. एस. डी. इंगोले आणि संजय राईचवार, नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, चंद्रकांत आष्ठनंकर, आणी सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.