गोंडवाना विद्यापिठातुन प्राविण्यप्राप्त विद्यार्थिनीचा सत्कार
भद्रावती : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उबाठा) तर्फे महिलांकरीता हळदी-कुंकु, वाण तसेच महिला स्नेहमिलन कार्यक्रम श्रृंखलेतील चौदावा कार्यक्रम भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे दि. 06 ला नंदोरी क्षेत्रातील महिला तसेच विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तसेच गोंडवाना विद्यापिठातुन प्राविण्यप्राप्त विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा परीषद क्षेत्रातील महिलांनी मोठया संख्येने सहभाग नोंदविला.
. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, शिवसेना नेत्या रश्मी ठाकरे यांचे सहभागाने वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन 80% समाजकारण व 20% राजकारण या भूमिकेतून चंद्रपूर जिल्ह्यातील 75, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्नेहसंमेलन सोहळा व मकर संक्रांतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत सामाजिक सौहार्द व एकोपा नांदत राहावा व चांगल्या विचाराचे आदान प्रदान व्हावे या हेतूने हळदीकुंकू वाण वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
. कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा महिला आघाडी जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर व मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमास मंचावर ईतर माण्यवरांच्या उपसथ्थीतीत भद्रावती कृउबास सभापती तथा उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
. प्रमुख पाहुणे म्हणून युवती जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, माजी नगरसेविका सुषमा शिंदे, उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक माया नरडे, भद्रावती कृ.उ.बा.स. उपसभापती तथा युवतीसेना जिल्हा समन्वयक अश्लेषा जिवतोडे-भोयर, भद्रावती कृउबास संचालक गजानन उताने, उपसरपंच उषा लांबट, माजी सरपंच अनुराधा पिंपळकर, माजी सरपंच वनिता पावडे, विभा जिवतोडे, संगिता घाटे, कल्पना कामडे, पूष्पा भटघरे, ज्योत्सना डोंगरे प्रिती पोहाणे, शांता रासेकर, मृणाली उमरे, सपना आत्राम, वैशाली झाडे, माधुरी काळे, वर्षा भोयर तसेच शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी, गणमाण्य प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित असून त्यानी मार्गदशन केले.
. या हळदी-कुंकु कार्यक्रमात गोंडवाना विद्यापिठातुन अर्थशास्त्र विषयात प्रथम मेरीट आलेल्या पल्लवी एकनाथ जीवतोडे तसेच पदवी विज्ञान शाखेतुन आठवी मेरीट आलेल्या समस्वी महेंद्र जिवतोडे या विद्यार्थीनीचा मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी करण्याकरीता भद्रावती महिला आघाडी तसेच महिला आघाडी पदाधिकारी भावना खोब्रागडे, शिला आगलावे, नेहा बन्सोड, मंजू खापने, रुपाली जिवतोडे, मीना एकरे, शांता काळे, दिपाली काळे, छाया देरकर, सुनंदा बोखरे, संगिता निखाडे, सूनीता ठावरी, सोनू नागतुरे, छबू जिवतोडे, प्रणाली ढवळे, निशा वाटेकर, प्रतिभा लांबट, गायत्री शिवरकर, सोनू मत्ते तसेच युवतीसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोलाचे सहकार्य केले.
. भद्रावती कृ.उ.बा.स. उपसभापती तथा युवतीसेना जिल्हा समन्वयक अश्लेषा जिवतोडे-भोयर यांनी प्रास्ताविक तर सपना संदीप दर्वे, ताई नवनीत ठावरी यांनी संचालन व पल्लवी एकनाथ जीवतोडे यांनी आभार प्रदर्शन केले. हर्षोल्लासात नंदोरी येथे हळदी-कुंकु, वाण वाटप व स्नेहमिलन सोहळा सफलतापुर्वक असंख्य महिलां च्या उपस्थितीत संपन्न झाला.


