टेकरीच्या कबड्डी रणसंग्रामात शिर्डीचा संघ अव्वल
सिंदेवाही : कबड्डी हा मैदानी खेळ असून सांघिक खेळ आहे. खेळाडूंनी मैदानावर खेळ खेळताना कोणताही राग, द्वेष, मनात न ठेवता एकतेचा भावनेतून खेळावे. कारण स्पर्धा म्हंटले की, जय, पराजय हा ठरलेला आहे. त्यामुळे पराभव झाला असेल तर त्या संघाने खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करावा. विद्यार्थी दशेत मी सुद्धा कबड्डी हा खेळ आवडीने खेळायचा, माझ्या विद्यार्थी जीवनामध्ये रनिंग व कबड्डी हाच खेळ आवडता होता. असे गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी टेकरी येथील श्री गुरुदेव क्रीडा मंडळाच्या वतीने नुकताच आयोजित केलेल्या रणसंग्राम कबड्डीचा या राज्यस्तरीय स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात प्रतिपादन केले. यावेळी शिर्डी येथील साईबाबा कबड्डी संघ प्रथम स्थानी असल्याने त्यांना रोख, व शिल्ड, देऊन त्या संघाचा गौरव करण्यात आला.
. मकरसंक्रांत च्या शुभपर्वावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेवर गावातील युवक वर्ग एक समूहाने एकत्रित येऊन श्री गुरुदेव युवा क्रीडा मंडळ, टेकरी( वानेरी) यांचे सौजन्याने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा रण संग्राम कबड्डीचा या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत राज्यातील अनेक भागातून कबड्डी मंडळ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रथम विजेता म्हणून साईबाबा क्रीडा मंडळ,शिर्डी हा संघ ठरला आहे. द्वितीय विजेता न्यू व्हिजन कबड्डी संघ बुटीबोरी, तर तृतीय विजेता भीमादेवी क्रीडा मंडळ भिवापूर आणि चतुर्थ क्रमांक वानेरीच्या संघाने पटकविले. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून न्यू व्हिजन कबड्डी मंडळ बुट्टीबोरी येथील खेळाडू आदित्य पोंगुळ हा ठरला. त्या बद्धल त्याला श्री गुरुदेव क्रीडा मंडळाच्या वतीने सायकल भेट देऊन गौरविण्यात आले.
. बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रामुख्याने चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर, भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू बाबा आगलावे ,माजी समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रितेश अलमस्त, संजय गांधी निराधार अध्यक्ष कमलाकर सिद्धमशेट्टीवार, कृषी अधिकारी महाले साहेब तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी मंडळाची शिस्तप्रिय प्रणाली पाहून सर्व पाहुण्यांनी स्पर्धेबद्दल श्री गुरुदेव क्रीडा मंडळाच्या बाबत गौरोद्वार काढले. खासदार अशोक नेते यांना नुकताच उकृष्ठ संसदपटू म्हणून गौरवीन्यात आले. त्यामुळे मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान चिन्ह,शाल श्रीफळं व ग्रामगिता देऊन सत्कार करण्यात आला.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मागील नऊ वर्षांपासून अविरत काम करणारे गुरुदेव क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा टेकरी येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष देवेंद्र मंडलवार यांचे पुढाकारातून मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.