Home सामाजिक सिंदेवाही मध्ये संजय गांधी निराधार योजनेत १४४ अर्जे मंजुर

सिंदेवाही मध्ये संजय गांधी निराधार योजनेत १४४ अर्जे मंजुर

1384

सिंदेवाही : संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका समितीची मासिक सभा नुकतीच सिंदेवाही येथील तहसील कार्यालयात पार पडली असून त्यामध्ये वृद्धापकाळ, विधवा, परितक्त्या, यांना मिळणाऱ्या योजनेबद्दल आलेल्या अर्जावर चर्चा करून एकूण १४४ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले असल्याने अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

.          संजय गांधी निराधार योजना या तालुका समितीची ३१ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात समितीचे अध्यक्ष कमलाकर सिद्धमशेट्टीवार यांचे उपस्थितीत दुपारी १२ वाजता सभा सुरुवात करण्यात आली. उपस्थित समितीसमोर योजनेकरिता अनुदान मिळणेबाबत प्राप्त झालेले अर्ज मंजुर / नामंजूर करण्याकरिता संजय गांधीनिराधार योजना समितीच्या समोर ठेवण्यात आले. यामध्ये संजयगांधी निराधार अनुदान योजनांचे एकूण ४६ अर्जा पैकी ४४ अर्ज मंजूर करण्यात आले.

.          एका अर्जामध्ये त्रुटी असल्याने त्रुटी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. इंदीरागांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन या योजनेमध्ये एकुण १८ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी एक अर्जामध्ये त्रुटी असल्याने १७ अर्ज मंजूर करण्यात आले. इंदीरागांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन या योजनेमध्ये एकही अर्ज प्राप्त झाले नाही. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजने मध्ये एकुण ८३ अर्ज प्राप्त झाले असून या पैकी ६६ अर्ज मंजुर करण्यात आले. ८ अर्ज नामंजुर झाले. तर ९ अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या. इंदिरागांधी राष्ट्रीय वृधापकाळ निवृत्ती वेतन या योजनामध्ये एकुण २३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १६ अर्ज मंजुर करून ३ अर्ज नामंजूर करण्यात आले. तर ४ अर्ज त्रुटी मध्ये आहेत. या पद्धतीनें एकूण १७० अर्ज प्राप्त झाले असून यापैकी १४४ अर्ज मंजूर करण्यात आले. तर ११ अर्ज नामंजूर करूंन १५ अर्जात त्रुटी आढळल्या आहेत. या
बैठकीला नायब तहसीलदार मंगेश तुमराम, संजय गांधी निराधार योजना विभागाच्या कटकमवार, रामटेके,समितीचे अध्यक्ष कमलाकर सिध्दमशेट्टीवार, राजू नंदनवार, मुरलीधर मडावी, किशोर भरडकर, हाडगे, अरुण सहारे, कोठेवार इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!