महानगरापेक्षा कर जास्त, सुविधा ग्रामपंचायतीपेक्षा अल्प   

30

नागरिकांत आक्रोश

नगरपालिका प्रशासनाच्या कारभाराला वैतागले गडचांदूरवासी 

गडचांदूर : गडचांदूर नगरपालिका प्रशासन सन 2024-25 या आर्थिक वर्षांपासून नवीन करप्रणाली अवलंबित आहे. वाढीव करप्रणाली विरोधात नागरिकांत आक्रोश दिसुन आहे.

.       गडचांदूर नगरपरिषदने सण 2024- 25 ते 2027-28 या चार वर्षासाठी प्रस्तावित चतुर्थ वार्षिक मूल्यांकन प्रस्तावित करून नागरिकांना विशेष नोटीस पाठविण्यात येत आहे. मात्र वाढीव कराची रक्कम बघून नागरिकांच्या मनात धडकी  भरत आहे. मूलभूत सुविधा पुरवताना अपयशी ठरणाऱ्या गडचांदूर नागरपरिषदच्या नवीन करप्रणाली विरोधात नागरिकांच्या मनात आक्रोश आहे. शहरात आज एकही सुविधा समाधानकारक नाही. कराची आकारणी महानगरापेक्षा जास्त तर मिळणाऱ्या सुविधा ग्रामपंचायतीपेक्षा कमी, अशी विपरीत परिस्थिती सध्या अनुभवास येत आहे.

.       शहरात नगरपालिका पुरवत असलेल्या मूलभूत सुविधांपैकी एकही सेवा सुविधा बिनबोभाट आणि समाधानकारक मिळत नाही. स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असून, सार्वजनिक दिवाबत्ती बहुतांश भागात बंद आहे. शहरात जंतुनाशक पावडरची फवारणी होत नाही. शहरवासीय घशाच्या आजाराने त्रस्त आहेत.

.       नियमित पाणीपुरवठा, स्वच्छतेकडे डोळेझाक करणारे पालिका प्रशासन नवीन करप्रणाली 2024-25 पासून लागू करीत आहे. पालिकेत होणारी मालमत्ताकराची आकारणी राज्यभरातील सर्व ‘क’ वर्ग नगरपालिकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. नवीन करप्रणालीनुसार नागरिकांना थेट दुपट्ट ते तिप्पट कर आकारणी जास्त झाली आहे. स्वच्छताकराच्या नावाने दरवर्षी  वाढवले जातात. शहराच्या सर्व बाजूंनी ढिगाऱ्यांनी कचरा साचला आहे. घंटागाडी नियमित येत नाही. त्यामुळे नागरिक रात्री-अपरात्री घरात साचलेला कचरा रस्त्याचकडेला अथवा मोकळ्या मैदानात फेकतात. नगरपालिका प्रशासन शहराची स्वच्छता करणाऱ्या ठेकेदार एजन्सीला दरमहा  लाखो रुपये केवळ कचरा संकलित करणे, रस्ते झाडणे यासाठी दिले जातात. वर्षाकाठी करोडो  रुपये स्वच्छतेवर खर्च दाखवला जातो. मात्र शहरात सर्वत्र कचरा पडलेला आढळतो.