आनंद निकेतन महाविद्यालयाच्या केमिस्ट्री विभागाचे पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत 

34

रसायनशास्त्र विभागाची पुनम बन विद्यापीठात पहिली मेरिट

वरोरा येथील अठरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत.

वरोरा 

.         येथील आनंद निकेतन महाविद्यालयात २०१६ -१७ पासुन एमएससी सुरू करण्यात आले तेव्हा पासून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निकालात आघाडी घेतली यावर्षी सुध्दा पुनम बन ही विद्यार्थिनी पहिली मेरिट लिस्ट मध्ये आली सोबतच ममता मजगवळी, मृणाल दडमल, श्रध्दा दुरुगकर, साक्षी धोबे, या विद्यार्थ्यांनी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, असा अनुक्रमे यादीत आले यांच्या सह काॅमर्स, आर्ट, सायन्स,सह ऐकुन अठरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत समावेश असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

.         2016-17 पासून आनंद निकेतन महाविद्यालयात एमएससी सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे तेव्हापासून सातत्याने एमएससी च्या परीक्षेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये येत आहेत. अभिमानाची बाब म्हणजे सन 2023-24 या वर्षातही महाविद्यालयाच्या अठरा विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने  एमएससी, एम.ए,बीकॉम व बी.एस्सी परीक्षांच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.यावर्षी एमएससी रसायनशास्त्र या विषयात मेरिट लिस्ट मधले पहिले पाचही विद्यार्थी महाविद्यालयाचे आहेत. पुनम  वाल्मिक (अविनाश) बन ,.ममता राजू मजगवळी,.मृणाल नथुजी दडमल, श्रध्दा लक्ष्मण दुरूकर साक्षी नारायण धोबे, यांनी अनुक्रमे पहिला,दुसरा, तिसरा,चौथा व पाचवा येण्याचा मान मिळवला. तसेच एम.एससी. वनस्पतीशास्त्र या विषयात आलिशा जीतेंद्र सोरदे, राधिका सुभाष लोनगाडगे, व निशा दशरथ बोढे, यांना पहिला ,तिसरा व पाचवा क्रमांक आला. एमएससी पदार्थविज्ञान या विषयात आचल हिरामन नारंजे हि गुणवत्ता यादीत अनुक्रमे दुसरी आली. सानिया जबिन शब्बीर शेख यांनीही एमएससी प्राणीशास्त्र या विषयात चौथा येण्याचा मान मिळवला. एमएस्सी गणीत या विषयात देखील, आचल माणिक धवले, हिने विद्यापीठातून पहिला येण्याचा मान प्राप्त केला.

.         2020-21 या वर्षात महाविद्यालयात एमए सुरु करण्यात आले. आणि या वर्षी एमए राज्यशास्त्र या विषयात, ऊर्मीला साईनाथ पटनाला हिने तिसरा तर एमए अर्थशास्त्र या विषयात पल्लवी एकनाथ जिवतोडे, व हेमलता प्रदीप डाहुले, यांनी अनुक्रमे प्रथम व तृतीय येण्याचा सन्मान प्राप्त केला. समस्वी महेंद्र जिवतोडे व  आदित्य प्रभाकर कडबेे, यांनी बीएससी पदवीमधून आठवे व दहावे मेरिट स्थान मिळवले. विशेष बाब म्हणजे रितू रवींद्र ढेंगुळे हिला बीएस्सी वनस्पतीशास्त्र या विषयात विद्यापीठातून सर्वात जास्त गुण मिळाले.

.         महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, आनंदवन विश्वस्त मंडळ तथा आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, प्राध्यापिका, व शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग सर्वच जण विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक करत आहे.