Home सामाजिक कोटगांवात विकसित भारत संकल्प यात्रा

कोटगांवात विकसित भारत संकल्प यात्रा

1403

नागभीड

.          नागभीड तालुक्यातील कोटगांव येथे विकशीत भारत याञा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमीत्याने आरोग्य विभाग, कृषी विभाग,  तालुका कृषी विभाग नागभीड, बाल विकास प्रकल्प नागभीड या विभागांनी आपला सहभाग नोंदवीला.

.          या कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वच्छतेचे जनक गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन करण्यात आली. यावेळी प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी आपआपल्या योजना जनतेसमोर ठेवल्या. शासनाच्या विविध योजना आहेत. त्या जनतेला माहीत नसतात. शासनाच्या योजना प्रत्येक नगरीकनपर्यंत कशा पोहचतील या हेतुन विकसीत भारत संकल्प याञा ठेवण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाने बि.पी. शुगरच्या रुग्णांची तपासनी केली. असंख्य महीलांनी आपली उपस्थिती दर्शविली.

.          गावातील ऊमेद निर्मित ग्रामसंघ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ऊमेदच्या माध्यमातुन महीला कशा सक्षम होत आहेत हे आपल्या मनोगतातुन व्यक्त केले. यावेळी मंचावर कोटगांवचे सरपंच सुनील वाघमारे, उपसरपंच यशवंत भेंडारकर, छाया भेंडारकर, आनंद जांभुळे, शेंडे, रघुर्ते कृषी विभाग, आंगनवाडी पर्यवेषक सलामे, आनंद मेश्राम पञकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार राहुल करंबे यांनी केले तर प्रास्तविक वैशाली ढोरे यांनी केले.

 

error: Content is protected !!