स्त्री मुक्ती दिनी” सिद्धांत हॉस्पिटलचे रोगनिदान शिबिर.

42

 धम्मभुमी परिसरात पार पडला धम्म प्रबोधन मेळावा 

सिंदेवाही

.            ज्या समाजात जन्माला आले, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे आहोत. ही संकल्पना घेऊन नवरगाव येथील सिद्धांत हॉस्पिटल चे डॉ. दीपक खोब्रागडे व डॉ.रोहिणी खोब्रागडे यांनी उमानदी शिवणी रत्नापुर येथील धम्मभूमी परिसरात आयोजित केलेल्या धम्म प्रबोधन मेळाव्यात मोफत रोगनिदान व उपचार शिबिर आयोजित करून शेकडो स्त्री पुरुष आणि बालकांची आरोग्य तपासणी करून आपले सामाजिक दायित्व सिद्ध केले.

.            धम्मभूमी विकास सेवा समिती शिवणी – रत्नापुर, नाचनभट्टी यांचे मार्फत दरवर्षी २५ डिसेंबर या स्त्री मुक्ती दिनी धम्मभूमी परिसरात धम्म प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात येते. या मेळाव्याला परिसरातील हजारो धम्म बांधव, तथा महिला उपस्थित राहून मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेत असतात. या निमित्ताने नवरगाव येथील सिद्धांत हॉस्पिटल चे बालरोग तज्ञ डॉ.दीपक खोब्रागडे, आणि स्त्री रोग तज्ञ डॉ. रोहिणी खोब्रागडे यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ व्यवसाय म्हणून न करता आपण समाजाचे काहीतरी देणे आहोत. ही भावना मनाशी बाळगून मागील पाच वर्षापासून महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी दिनी मोफत रोगनिदान व उपचार शिबिर आयोजित करून हजारो नागरिकांची तपासणी करून उपचार करीत असतात. दरम्यान धम्मभूमी परिसरात आयोजित केलेल्या धम्म मेळाव्यात डॉ. खोब्रागडे दाम्पत्य यांनी रोगनिदान व उपचार शिबिर आयोजित करून अंदाजे ६०० नागरिकांची आरोग्य तपासणी करून घेतली. आणि त्यांना उपचार करण्याचा मोफत सल्ला देण्यात आला. हा शिबीर यशस्वी करण्यासाठी सिद्धांत हॉस्पिटल चे औषध विक्रेते विजेंद्र पिलेवान, मोनिका मांदाडे, तेजश्री हेडाऊ, सुजल खानोरकर, तथा धम्मभूमी विकास सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.