Home सामाजिक गाडगे महाराजाच्या जयजयकाराने दुमदुमला गवराळा वॉर्ड

गाडगे महाराजाच्या जयजयकाराने दुमदुमला गवराळा वॉर्ड

1491

भद्रावती

.          स्थानिक गवराला वॉर्ड भद्रावती येथे कर्मयोगी गाडगे बाबा यांचा 67 वा पुण्यतिथी महोत्सव दि.23 व 24 डिसेंबर ला अध्यक्ष मधुकर क्षीरसागर व सर्व समाज बांधवांच्या सहकार्यातून उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.

.          दि. 23 ला सकाळी दीपप्रज्वलन व ग्रामसफाई, रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा ने कार्यक्रमा सुरवात होऊन सायंकाळी प्रकाश पिंपळकर यांच्या साई म्युझिकल ग्रुपने सुमधुर गीताने मंत्र मुग्ध केले तर दि. २४ ला समाज बांधव व विविध भजन मंडळी व बबलू पद्मगिरीवार, सुनील देठे लिमेश माणुसमारे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेचा संदेश देत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जेष्ठ नागरिकांचा उत्साह विशेष होता.भद्रावती चे मा. नगराध्यक्ष अनिल धानोरकर व आस्थादाई धनोजे कुणबी अध्यक्ष पांडुरंग टोंगे यांनी उपस्थित राहून समाज बांधवांना एकोपा व समनव्य राखून असे समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात सदोदित सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

.          कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बंडू भोस्कर किशोर भोस्कर, उज्वल किंनेकर, श्यामराव नक्षीने, कवडू नाईक, संदीप चटपकर, किरण किंनेकर, सुखदेव पत्रकार मधुकर नांदे, आन्याजी सोनूलकर, महिला प्रमुख नीता आंबिलकर, उज्वला भोयर तसेच स्वयंसेवी समाज बांधव व जय जगन्नाथ सेवानिवृत्त मित्र मंडळ गवराळायांनी विशेष सहकार्य केले.
भव्य भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!