Home सामाजिक पोषण सुरक्षे करिता भरडधान्याचा वापर आवश्यक

पोषण सुरक्षे करिता भरडधान्याचा वापर आवश्यक

1479

    वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमोलकुमार सोळंके   

वरोरा

.         सध्या आपल्या देशातील अन्नसुरक्षितता मजबूत असून आता आपल्याला पोषण सुरक्षे कडे जायचे आहे त्याकरिता भरड धान्याचा वापर हा अतिशय आवश्यक आहे असे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून बोलताना वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अमोलकुमार सोळंके यांनी चारगाव येथील शेतकरी मेळाव्यात केले.

.         भारतीय कृषी अनुसंधान संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संस्था नवी दिल्ली, कृषी विभाग महाराष्ट्र राज्य, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा तथा ध्रुवतारा ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड वरोरा च्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या पर्वावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

.         या मेळाव्याला उद्घाटक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी सुशील लव्हटे, प्रमुख पाहुणे डॉ. पी के मंडल मुख्य शास्त्रज्ञ नवी दिल्ली, डॉ. नवीन गुप्ता वरिष्ठ शास्त्रज्ञ नवी दिल्ली तर मार्गदर्शक म्हणून डॉ. सतीश इमडे सहाय्यक प्राध्यापक आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा ,डॉ रामचंद्र महाजन,यशवंत सायरे मानद सचिव वैनगंगा शेतकरी उत्पादक कंपनी संघ चंद्रपूर, बालाजी ढोबे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा संचालक कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी, योगेश वायदुडे सरपंच चारगाव (बु) , दयाराम ननावरे अध्यक्ष विविध सहकारी सोसायटी चारगाव , अभिजीत पावडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा, विजय काळे कृषी अधिकारी, प्रफुल आडकीने कृषी पर्यव्यक्षक वरोरा हे मान्यवर उपस्थित होते.

.         उद्घाटक म्हणून बोलताना सुशांत लव्हटे उपविभागीय कृषी अधिकारी वरोरा यांनी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी विविध योजनांच्या माध्यमातून उभे असून त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा तसेच जमिनीतील पोषक मूलद्रव्ये वाढवावे असे आवाहन प्रसंगी केले, प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत असताना डॉ रामचंद्र महाजन यांनी भरड धान्याचे मानवी जीवनातील महत्त्व आणि त्याचा वापर अधिकाधिक कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले तसेच डॉ सतीश इमडे यांनी स्थानिक वातावरणामध्ये कुठल्या भरड धान्य उत्पादनावर भर द्यावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून भरडधान्याच्या विपणना संदर्भात बालाजी धोबे, यशवंत सायरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

.         मेळाव्यात शेतकऱ्यांना शेतीच्या दैनंदिन वापरातील उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले . सदर कार्यक्रमाचे संचालन स्मिता सोनेकर, चंद्रशेखर झाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण भांडारकर यांनी केले . मेळाव्याचे आयोजन कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा संचालक संदीप सोनेकर यांच्या नेतृत्वात कंपनी संचालक, प्रवर्तक अभय पारखी , उल्हास बोढे, किशोर डोंगरकर , विजय पावडे , प्रशांत काकडे , नितिन आडे यांच्या मदतीने करण्यात आले . सदर कार्यक्रमाला पंचक्रोशीतील जवळपास 250 शेतकरी तथा शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!