स्टेम पोदार लर्न स्कूलमध्ये दोन दिवसीय भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन

78

ब्रम्हपुरी

.          स्थानिक शिक्षण संस्था स्टेम पोदार लर्न स्कूल येथे दोन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पोदार एज्युकेशन नेटवर्क नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता तत्परतेने कार्य करत असते तसेच अभ्यासक्रमासोबतच इतर सहशालेय उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

.          महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पूर्व प्राथमिक म्हणजे पोदार जम्बो किड्स च्या विद्यार्थ्यांकरीता आयोजन करण्यात आले होते. यावेळेस निखिल पोटदुखे व डॉ. नारिंगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर दुसऱ्या दिवशी इयत्ता १ली ते ८वी च्या विद्यार्थ्यांकरिता आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. नारायण मूर्ती, डॉ. नितीन उराडे , सविता उराडे, वैशाली उराडे, दर्शना उराडे, प्राचार्य प्रवीण ढोले, पीजेके हेडमिस्ट्रेस प्रीती काळबांडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध ड्रील चे सादरीकरण करण्यात आले यामध्ये पॉम पॉम ड्रिल, फ्लॅग ड्रिल, म्युझिकल पिटी, हुलाहुप ड्रिल, डंबेल ड्रिल, लेझीम इत्यादीचा समावेश होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या रनिंग रेस व फन रेस चे फायनल सामने घेण्यात आले व विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडल्स व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात आजी-आजोबा, पालक यांच्याकरिता सुद्धा फन रेस व रनिंग रेसचे आयोजन करण्यात आले होते.

.          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता पोवळे, सारिका कोल्हेकर, ममता राऊत, प्रशांत डोंगरे व रेश्मा मासुरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश कुमार राऊत व सुवर्णा कळमकर यांनी केले. प्राचार्य प्रवीण ढोले यांनी सांगितले की खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्याकरता या क्रीडा महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.

.          कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता प्राचार्य प्रवीण ढोले व पीजेके हेडमिस्ट्रेस प्रीती काळबांडे यांच्या नेतृत्वात प्रशासकीय अधिकारी अजय पाटील, परिवहन अधिकारी प्रीतम दमाहे, प्रज्ञा गायधने, सायली तिजारे, स्नेहा खुणे, कोमल बुलबुले, मयूर बोनमपल्लीवार, प्रसेनजित कोल्हे, नमिता चुंडुके आदींनी सहकार्य केले.