श्रद्धेला अंधश्रधेत रूपांतर करू नका

88

आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रतिपादन

मुनी समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व सत्कार समारंभ

विसापूर 

.         आपली संस्कृती श्रद्धा बाळगणारी आहे. पण ही श्रद्धा डोळस असली पाहिजे. आपल्या अंतर्मनाला ओळखून कोणाप्रती श्रद्धा ठेवावी.त्याच दिशेने आपली वाटचाल असावी. याचा आपण आजघडीला बोध घेण्याची गरज आहे.समाजातील अंधश्रद्धा कमकुवत करणारी आहे. आपण देखील श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत करू नका, असे विचार नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार सुधाकर अडबाले यांनी शुक्रवारी विसापूर येथे व्यक्त केले.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील स्थानिक मुनी समाज बहूउध्हेशिय संस्थेच्या वतीने योगाचार्य राजेश्वरराव टोंगे सभागृह, मुनी समाज भवनात मुनी समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते समाज बांधवाना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामभाऊ टोंगे होते.

.         यावेळी मंचावर सत्कारमुर्ती आमदार सुधारकर अडबाले, कोरपना येथील प्रभाकरराव मामुलकर कला महाविद्यालयाचे प्रा. डा. सुदर्शन दिवसे, विदर्भ शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण धोबे, विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, बाजार समितीचे माजी संचालक विजय टोंगे, प्रा. शामकुमार डाहाले, मुनी समाजाचे अध्यक्ष शालिकराव भोजेकर, वसंतराव टोंगे आदी उपस्थित होते.

.         आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते पंडित योगमुनी शिवमुनी शास्त्री व योगाचार्य राजराजेश्वर टोंगे यांच्या प्रतिमेला मालर्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले. दरम्यान चिंतामणी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील शिक्षक वृंद, जिल्हा परिषद हायस्कूल, विसापूर येथील मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व मुनी समाज योग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधाकर अडबाले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार केला. दरम्यान प्रा. सुदर्शन दिवसे, विजय टोंगे, रामभाऊ टोंगे यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथींच्या हस्ते मुनी समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर पारखी यांनी केले. संचालन सुरेश पंदिलवार यांनी केले. आभार संदीप गौरकर यांनी मानले. यावेळी समाज बांधवांची उपस्तिथी मोठ्या संख्येनी होती.