चंद्रपुर जिल्हात यवतमाळच्या रेती तस्करांची धुळघुस
पोलिस व महसूल विभागा हप्ते बांधणी
पाटाला-राळेगाव घाटातून अवैद्य वाळू चोरी
संदिप झाडे
माजरी
. भद्रावती तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या वर्धा नदीत वाळू माफियांच्या हालचाली अचानक वाढल्या आहेत. वाळू चोर अर्धा डझनहून अधिक ट्रॅक्टर आणि वोलवो टीप्पर च्या मदतीने महसूल व पोलिस प्रशासनाच्या डोळ्या देखत शासनाच्या महसुलाची चोरी करत आहे. मात्र महसूल व पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना रेती तस्कराकडून हप्ता बांधणी केल्या गेली असल्याची माहिती खुद्द रेती माफियाकडून सांगल्या जात आहे. यामुळे रेती माफीयांना सुगीचे दिवस आले आहे. तर चंद्रपूर जिल्हात यवतमाळ जिल्ह्यातील रेती तस्कर धुळघुस करताना दिसत आहे.
. वर्धा नदीतून माजरी, राळेगाव, पाटाळा, मणगाव, देऊळवाडा नदी घाटातून वाळूचे अवैध उत्खनन सुरू आहे. मात्र महसूल विभागाचे मौन संशयास्पद आहे चोरीची वाळू बाजारात खुलेआम अधिक दराने विकली जात आहे. स्थानिक पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या आशीर्वादा शिवाय हे काम शक्य नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. वर्धा नदीपात्रातून वाळूची मनमानी चोरी होत असल्याने पर्यावरणाचीही हानी होत आहे. जीवदान देणाऱ्या नदीच्या अस्तित्वावरील संकट ओढवले आहे, वर्धा नदीत अनेक ठिकाणी वाळूच्या खाणी उभ्या राहिल्या आहेत, त्यामुळे जनजीवनही विस्कळीत होत आहे. माहितीनुसार, माजरी व्यतिरिक्त राळेगाव पाटला, वाळूच्या या अवैध धंद्यात आजूबाजूचे भागही गुंतले असून, महसूल व पोलिस प्रशासनाचे कर्मचारी व अधिकारी या रेती माफिया कडून महिन्याकाठी दहा ते विस हजार रुपये हप्ता घेत असल्याचे खुद्द रेती माफियाकडून घेतल्या जात असल्याचे सांगल्या जात आहे.
. त्यामुळे या रेती माफिया वर कारवाही होत नाही. अधिकारी व रेती माफिया दोघांकडूनही शासनाच्या तिजोरीला लुटण्याचे काम सुरू आहे. तर या व्यवसायात राजकीय नेतेही सहभागी असून खुलेआम रात्रंदिवस अवैद्य रेतीचा उपसा करून लाखोची माया जमविताना दिसत आहे. गावकर्यांनी वाळू उत्खननाला विरोध केला तर वाळू माफिया आणि राजकारण्यांकडून त्यांना धाक दाखवला जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही उपयोग नाही. व पोलिसा कडून कोणतीही सुरक्षा पुरवली जात नसल्याने ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालने गरजेचे असून रेती घाटांचा लिलाव करून शासनाची कोट्यवधी रुपयांची महसूल चोरी वाचवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे अवैध वाळू वाहतूक करताना पेट्रोलिंग दरम्यान पकडलेल्या सर्व वाहनांवर कारवाई केली जाते. पोलिस ठाण्यातून कारवाई केल्यानंतर ते महसूल विभागाला कळवतात. त्यांना दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आहेत. आतापर्यंत दहा ट्रॅक्टर पकडले आहेत. आणि कारवाई केली. अजितसिंग देवरे, ठाणेदार, माजरी पोलीस स्टेशन