शिवसेना (उबाठा) पुर्व विदर्भ संपर्क नेते आ. भास्कर जाधव यांनी घेतला वरोरा विधानसभा क्षेत्राचा आढावा

63

 भास्कर जाधव यांना ग्रामगिता तर गरीब विद्यार्थिनीला सायकलचे वाटप 

वरोरा

.          पुर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांनी नुकतीच शिवसेना (उबाठा)  वरोरा-भद्रावती विधानसभा पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय “शिवालय” येथे भेट दिली. भेटी दरम्यान भास्कर जाधव यांनी विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतला. विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी भास्कर जाधव यांचे स्वागत करीत ग्रामगिता भेट दिली. सोबतच पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, पुर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे, पुर्व विदर्भ युवासेना विभागीय सचिव तथा गोंडवाना सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, नागपूर ग्रामिण संपर्क प्रमुख बाळा राऊत, कामगार सेना जिल्हा सचिव अमोल मेश्राम यांचीही उपस्थिती होती.

.     वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी विधानसभा क्षेत्रात शिवसेना पदाधिकारी यांना सोबत घेवून होवू द्या चर्चा अभियान, शिवसेनेनी जिंकलेले निवडणूक जसे सहकार क्षेत्रातील सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक इत्यादीची माहिती दिली. तसेच विधानसभा क्षेत्रात होत असलेली सामाजिक कामे, जनतेच्या समस्या जाणून घेत त्याचे निराकरण करणे याबाबत सुध्दा माहिती देण्यात आली.

.     विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे कार्य जनहितार्थ आहे. अल्पावधीत त्यांनी या क्षेत्रात शिवसेनेचे उत्कृष्ट कार्य राबविले, शिवसेनेचे झेंडे रोवले, असेच कार्य सुरू ठेवा, असे अभिनंदनीय वक्तव्य आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी केले.

.     यावेळी प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे, माजी जिल्हा प्रमुख सतिश भिवगडे, माजी सहसंपर्क प्रमुख रमेश देशमुख, माजी उप-जिल्हा प्रमुख जयदिप रोडे, माजी महानगर प्रमुख मनोज पाल, माजी नगरसेवक आकाश साखरकर आदी उपस्थित होते.

.     या भेटी दरम्यान आई वडील शेतमजुर असून गरीब परिस्थीतीत बाराव्या वर्गात लोकमान्य कन्या विद्यालय, वरोरा येथे शिक्षण घेत असलेल्या खुशी शंकर गोवारदीपे हिला पुर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते सायकल भेट देण्यात आली.

.     याप्रसंगी महिला जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर, उप-जिल्हा प्रमुख तथा सभापती कृउबास भद्रावती भास्कर ताजणे, जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले आणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा क्षेत्रातील शिवसेना आजी – माजी पदाधिकारी सर्व विंग, शिवसैनिक आदी मोठया संख्येने उपस्थित होते.