Home सामाजिक संत ज्ञानदेव संजीवन समाधी दिनानिमित्त व्याख्यान

संत ज्ञानदेव संजीवन समाधी दिनानिमित्त व्याख्यान

1424

 विवेकानंद महाविद्यालयात आयोजन 

भद्रावती 

.         स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्यावतीने “संत ज्ञानदेव संजीवन समाधी दिनानिमित्त” व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती येथील डॉ. सुधीर मोते यांनी संत ज्ञानदेव संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त ‘संत ज्ञानदेवाचा मानवतावादी दृष्टिकोन’ या विषयावर विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान दिले.

.          समाधी, देहत्याग, वेदांचे पठण व अध्ययन, त्यात त्रैवर्णिकांचे प्रस्थ, वेदांची विषमतावादी दृष्टी, अशा वेदांची ‘कृपण’ अशी संभावना करून दिलेला धक्का, संत ज्ञानदेवांची विश्वव्यापक दृष्टी, मानवता धर्म, पसायदानाची कालातीत उपयुक्तता, पसायदानातील मानवतावादी दृष्टी, मानवतेच्या समतेची, मानवतेच्या ममतेची भूमिका, अशा अनेक मुद्यांना स्पर्श केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे होते.

.         कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.अमोल ठाकरे,संचालन डॉ.ज्योती राखुंडे, आभारप्रदर्शन सोनाली तायडे हिने मानले. विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे यांच्या मार्गदर्शनात समाजशास्त्र विभागामार्फत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!