साहेब ! आम्हाला अमान्य पीक काढून विकण्याची परवानगी द्या 

79
  • आसाळ्याच्या शेतकर्‍याची मायबाप सरकारला विनंती
  • अधिकार्‍यांनी फिरविली शेतकर्‍यांच्या समस्या कडे पाठ

चंद्रपुर

.                    विदर्भातील शेतकरी पारंपारिक शेती करतात. अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले तरीही आम्ही संकटाला तोंड देत शेती करतो. मात्र शेत पिकाच्या झालेल्या नुकसानी बाबत अधिकार्‍यांना तक्रार करूनही अधिकारी पाठ फिरवीत असल्याने मायबाप सरकार नी आम्हाला अमान्य पीक काढून विकण्याची परवानगी देण्याबाबत आसाळ्याच्या शेतकर्‍यांने तहासिलदारा मार्फत मायबाप सरकारला निवेदन दिले आहे.

.                   वरोरा तालुक्यातील आसाळा येथील शेतकरी किशोर डुकरे हे पारंपारिक पद्धतीने पिढ्यान पिढ्या शेती व्यवसाय करतात. आत्ता पर्यंत निसर्गाच्या लहरीपणा मुळे व होत असलेल्या अवकाळी पावसाने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना शेतकर्‍यांनी तक्रारी दिल्या. मात्र शेतकर्‍यांच्या समस्याचे अर्ज दोन दोन वर्ष आवक जावक विभागात धूळखात पडलेले आहे. याकडे वरिष्ठ अधिकारीही कानाडोळा करताना दिसून येत आहे. तर शासनाचे कोणतेही अधिकारी शेतकर्‍यांच्या समस्या समजून घेत नसून त्यांच्या समस्याकडे पाठ फिरवीत असल्याने शेतकर्‍यांनी कुणा कडे दाद मागावी. वरोरा महसूल व पोलिस विभागात शेतकर्‍यांनी पांदन रस्ते, शेतीचे वाद, शेतपिकाचे नुकसान, शेतातून होत असलेल्या पाण्याच्या मोटार चोरी व शेती विषयक उपकरणे आदी विषयावर तक्रारी देऊनही शेतकर्‍यांच्या समस्याकडे लक्ष देत नाही. व साधे पाहणी सुद्धा करायला येत नाही. यामुळे मायबाप सरकारने आम्हाला अमान्य पिकाची लागवड करण्याची परवानगी देण्यात यावी. आणि त्या पिकाची काढणी करून बाजारात विकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. अश्या मागणीचे निवेदन किशोर डुकरे यांनी मायबाप सरकारला वरोरा तहसीलदार यांच्या मार्फत पाठविले आहे.