Home सामाजिक महापरिनिर्वाण दिनी देहदानाचा संकल्प करून महामानवाला आदरांजली

महापरिनिर्वाण दिनी देहदानाचा संकल्प करून महामानवाला आदरांजली

1339

ब्रम्हपुरी

.         डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्रम्हपुरी येथील मदन शेंडे व त्यांच्या पत्नी आणि मधू बनकर यांनी. महामानवाला अनोखे अभिवादन करण्यासाठी महापरिनिर्वाण दिनी आपले देह दान करण्याचा निर्णय घेतला व त्याची रितसर प्रक्रिया ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे पूर्ण केली.

.         डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी विवीध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आयोजीत केले जातात. आणि काही असं काही करतात जे समाजाला कायमच लक्षात राहील, समाजाच्या उपयोगी पडेल असच काही केलय ब्रम्हपुरी येथील शेंडे दाम्पत्य मदन शेंडे व त्यांच्या पत्नी यांनी तर मधू बनकर यांनी, महामानवाला अभिवादन करण्यासाठी महापरिनिर्वाण दिनी या तिघांनी ही आपले देह दान करण्याचा निर्णय घेतला व त्याची रितसर प्रक्रिया ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे पूर्ण केली. यावेळी विवीध संघटनांची पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!