Home सामाजिक अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून विद्यार्थ्यांना घरगुती आग सुरक्षा मार्गदर्शन

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून विद्यार्थ्यांना घरगुती आग सुरक्षा मार्गदर्शन

1324

गडचांदूर

.        अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ कंपनीकडून सामाजिक दायित्वांच्या कार्या द्वारे विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महात्मा गांधी जूनियर कॉलेज गडचांदूर येथील विद्यार्थ्यांना घरगुती आग सुरक्षा बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

.        या कार्यक्रमात आग कशी लागू शकते, लागल्यास त्या पासून काय हानी होऊ शकते व त्यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो हे प्रात्यक्षिका द्वारे माणिकगड सिमेंट वर्क्सच्या विभागाने 700 विद्यार्थी आणि शिक्षकांना समजवून सांगितले. या प्रात्यक्षिकात आग लागल्यावर्ती अग्निरोधक कसे वापरावे हे विद्यार्थी व शिक्षकांना समजवून सांगण्यात आले यावेळी . विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत पुरस्कृत करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य ,स्मिता चिताडे , उप प्राचार्य माहुरे तसेच माणिकगढ संघ आणि शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

.        या कार्यक्रमांक वेळी प्राचार्य चिताडे यांनी बोलतांना म्हटले कि हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून या पासून आम्हाला व विध्यार्थ्यांना घरगुती आग सुरक्षे बद्दल मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सर्व शिक्षक वर्गानी या कार्यक्रमांची मनशोक्त प्रसंशा केली व असे उपक्रम पुन्हा पुन्हा राबवावे अशी विनंती सुद्धा केलीत.

error: Content is protected !!