चारगाव खुर्द येथे आर ओ वॉटर एटीएम चे उद्घाटन

42

    आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले उद्घाटन   

वरोरा

.         स्थानिक चारगाव खुर्द येथे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर खनिज विकास निधी अंतर्गत चारगाव खुर्द येथे आरो वॉटर एटी एम मशीनचे उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते पार पडले.

.         स्थानिक चारगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न वारंवार निर्माण होत असल्याने जनतेच्या सेवेकरिता जनतेला व नागरिकांना शुद्ध पाण्याची सोय निर्माण व्हावी याकरिता येथील सरपंच राजेंद्र चिकटे यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा चंद्रपूर खनिज विकास निधी अंतर्गत 15 लक्ष रुपये रुपयातून आर ओ वॉटर एटीएम शुद्ध पाण्याची मशीन उपलब्ध करून दिली. त्याचाच उद्घाटन सोहळा येथील आमदार प्रतिभा सुरेश धानोलकर यांच्या हस्ते पार पडला.

.         यावेळी चारगाव खुर्द येथील सरपंच राजेंद्र चिकटे, उपसरपंच सुवर्णा शेंडे, सदस्य वनिता कष्टी, सुनीता पावडे, दुर्गेश पावडे, सिद्धार्थ गायकवाड, सखुबाई शेंडे व  सुलखा दडमल, संजय चौवले, सचिव सचिन लांडे, अभय धोबे, मनोहर शिरसागर, प्रकाश कष्टी, शरद मोडक, सचिन चौवले, मारुती जुनारकर, विना मिसाळ, बबन एकरे व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.