Home सामाजिक इनरव्हील क्लब भद्रावती कडून वृद्धांना ब्लॅंकेट चे वाटप

इनरव्हील क्लब भद्रावती कडून वृद्धांना ब्लॅंकेट चे वाटप

1231
 डिस्ट्रिक्ट चेअरमन शिला देशमुख यांची इनरव्हील क्लब भद्रावती ला भेट 

भद्रावती

.         येथील सुविधा केंद्र  येथे इनरव्हील क्लब भद्रावतीची ओसीव्हि बैठक आयोजित करण्यात आली.  या बैठकीला डिस्ट्रिक्ट चेअरमन शिला देशमुख ह्या प्रमुख  मार्गदर्शक  म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते अपणापन  वृद्धाश्रम येथील वृद्धांना थंडीपासून संरक्षण व्हावे यास्तव ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.

.         या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर शिला देशमुख यांनी  इनरव्हील क्लब भद्रावतीच्या यावर्षीच्या प्रोजेक्ट फाइल्स जाणून घेतल्या. या बैठकीचे औचित्य साधून  इनरव्हील क्लब भद्रावतीने डिस्ट्रिक्ट चेअरमन शिला देशमुख यांच्या हस्ते अपणापन  वृद्धाश्रम येथील वृद्धांना थंडीपासून संरक्षण व्हावे यास्तव ब्लॅंकेट चे वाटप केले.

.         या बैठकीला इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वाती चारी, सचिव प्रेमा पोटदुखे, आयएसओ तृप्ती हिरादेवी, कोषाध्यक्ष वैशाली तेलंग, सी सी रश्मी बीसेन, माला प्रेमचंद , केशनी हटवार, वर्षा धानोरकर, आशा कौशल, मनीषा ढोमणे, शुभांगी बोरकुटे,  विश्रांती उराडे, जयश्री कांबडी, विभाग बेहरे, भद्रावती इनरव्हील क्लब च्या सदस्यां उपस्थित होत्या. वृद्धाश्रमाच्या प्रमुख साहिस्ता पठाण  व वृद्धाश्रमातील वृद्ध  या प्रसंगी उपस्थित होते.

.         या वेळी डिस्ट्रिक्ट चेअरमन शिला देशमुख यांचा परिचय इनरव्हीलच्या सचिव प्रेमा पोटदुखे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशनी हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रश्मी बीसेन यांनी केले.

error: Content is protected !!