Home सामाजिक सेवानिवृत्त प्रा. अशोक डोईफोडे यांचा कर्मचारी पतसंस्था च्या वतीने सत्कार

सेवानिवृत्त प्रा. अशोक डोईफोडे यांचा कर्मचारी पतसंस्था च्या वतीने सत्कार

1199

गडचांदूर

.          गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचांदूर च्या वतीने एम सी व्ही सी विभागाचे सेवानिवृत्त विभाग प्रमुख प्रा अशोक डोईफोडे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर च्या प्राचार्या स्मिता चिताडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

.          याप्रसंगी प्रभा डोईफोडे, महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर चे प्राचार्य डॉ शैलेंद्र देव, सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनूरवार, कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत धाबेकर, व्यवस्थापक प्रमोद काळे, सुहास डोईफोडे, सुभाष खुजे, विनोद भोगेकर व इतर उपस्थित होते.

error: Content is protected !!