Home सामाजिक गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलीचे वितरण

गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलीचे वितरण

1202

चंद्रपूर 

.         वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 पुण्यतिथीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते राहुल देवतळे व मित्र परिवारातर्फे स्थानिक विठ्ठल व्यायाम शाळेच्या पटांगणात भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 26 भजन मंडळांनी सहभाग घेतला. स्पर्धेत प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्यांना रोख बक्षीस देण्यात आली. यावेळी विठ्ठल मंदिर प्रभागातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्यात आले.

.         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल व्यायाम शाळेचे अध्यक्ष धनाजी येरेवार होते तर उद्घाटक म्हणून रुखमाई ज्येष्ठ नागरिक कृती मंडळाचे अध्यक्ष बिंदुबाबू बडकेलवार, सामाजिक कार्यकर्ते शिवा कोरेवार, राहुल देवतळे , राजेंद्र आखरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अरूण गर्गेलवार, अनिल दळणे,संजय जिझीलवार, संजय पवार, किशोर वैद्य यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन अरूण गर्गेलवार तर आभार ग्राम गीताचार्य दादाजी नंदनवार यांनी मानले.

error: Content is protected !!