रेल्वे रुळावर गमावला जीव : जुलै महिन्यात मुलाने संपवली होती जीवनयात्रा
चंद्रपूर
. घरातील संसाराची पती पत्नी दोन चाके. सुखाचा संसार याच चाकामुळे पुढे चालतो.मात्र पती – पत्नीतील मतभेद सुखी संसार उद्वस्त करतो. याच मतभेदामुळे काही दिवसापूर्वी एकुलत्या मुलाने घरीच जीवनयात्रा संपवली होती. यामुळे गृह कलह विकोपाला गेला.अखेर त्याने देखील दिवाळीच्या सणाच्या दिवशी रेल्वे रुळावर जीव गमावला.ही मनाला चटका लावणारी व ह्रदयद्रावक घटना रविवार दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान चंद्रपूर येथील बाबुपेठ रेल्वे मार्गावर घडली. रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव निर्दोष नामदेव जयकर ( वय-४६ )रा.विसापूर ता.बल्लारपूर जि.चंद्रपूर असे आहे. या घटनेमुळे निर्दोषचे पत्नीपुढे निर्दोषत्व अखेर सिद्ध झालेच नाही,असेच म्हणावे लागेल.
. निर्दोष जयकर चे १८ वर्षांपूर्वी जोत्स्ना देठे सोबत लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर दोघांनी सुखी व आनंदी आयुष्याचे स्वप्न रंगवले.त्यांच्या संसार वेलीवर प्रियांसू नावाचा मुलगा आला.मात्र काही वर्षानंतर निर्दोष व जोत्स्ना मध्ये वादाची ठिणगी पडली. हळूहळू वादाचे रूपांतर तीव्र मतभेदात झाले.अशातच जोत्स्ना हिने निर्दोषला कुटुंबापासून दूर केले.
. निर्दोष चंद्रपूर येथील एका गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानात कामाला होता.जोत्स्ना हिने आपल्या वडिलांच्या चंद्रपूर येथील भिवापूर वार्डात असणाऱ्या घरी निर्दोष व मुलगा प्रियांशु ला घेऊन गेली.मात्र त्या ठिकाणी देखील दोघांतील मतभेदाची किनार थांबली नाही.पत्नी जोत्स्ना हिने निर्दोषचे मानसिक छळ करणे थांबविले नाही. गृह कलह पुन्हा विकोपाला गेला. आई वडिलातील संघर्ष मुलगा प्रियांशु दररोज पाहत होता. एका शुल्लक कारणावरून चिडून त्याने १0 जुलै २0२3 रोजी प्रियांशुने घरीच गळफास घेत जीवनयात्रा संपवली. यावरून पुन्हा दोघांत मतभेदाची धार तीव्र झाली. निर्दोष व जोत्स्ना यांच्यात दुरावा निर्माण झाला.दररोज भांडणे होऊ लागली.पत्नी जोत्स्नाच्या मानसिक व शरीरिक त्रासाला कंटाळून निर्दोषने दिवाळीच्या दिवशी रविवार दि. १२ नोव्हेंबर रोजी बल्लारपूर – चंद्रपूर रेल्वे मार्गावर रेल्वे खाली जीव गमावला. या घटनेची तक्रार निर्दोष याचा मोठा भाऊ अमर नामदेव जयकर याने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात केली.या प्रकरणी निर्दोषची पत्नी जोत्स्ना जयकर हिच्या विरोधात भा. द.वि. च्या कलम 306,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना म्हणजे निर्दोषचे पत्नीपुढे मरे पर्यंत निर्दोषत्व सिद्ध होऊ शकले नाही,अशीच घडली आहे.
पत्नीने पत्नीच्या अंत्यसंस्काराकडे फिरवली पाठ विसापूर येथील निर्दोष जयकर यांचे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. काल रविवारी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे करण्यात आले. त्या नंतर त्याचा मृतदेह विसापूर येथे रात्री आणण्यात आला. याची माहिती पोलिसांनी पत्नी जोत्स्ना हिला दिली. मात्र तिने मी बाहेर गावी असल्याचे सांगितले. सोमवारी विसापूर येथील स्म्शानभूमीवर निर्दोषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र पत्नी जोत्स्ना हिने निर्दोषच्या अंत्यसंस्काराकडे पाठ फिरविल्याने नातेवाईकात उलटसुलट चर्चा केली जात आहे. एकीकडे चार महिन्यापूर्वी पोटचा मुलगा जगावेगळा झाला. आता पतिनेही जगाचा निरोप घेतला .मात्र पत्नी जोत्स्ना हिने पतीच्या अंत्यसंस्काराकडे का पाठ फिरवली, हा प्रश्न कायम आहे.

