चार महिन्यापासून वेतनच नाही
बल्लारपूर
. ग्रामीण भागातील रुग्णांना त्वरीत उपचार मिळावा यासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात 102 नंबरच्या रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यांच्यावरील चालकांचे वेतन अदा करणे केंद्र सरकारची जबाबदारी आहे. परंतु राज्य शासन मागील अनेक वर्षापासून कार्यरत असलेले वाहनचालकांना कंत्राटी पद्धतीने चालकांची नियुक्ती करुन ठेकेदारामार्फत त्यांना वेतन दिले जात आहे. हे ठेकेदार या चालकांची फसवणूक करुन शासनाने ठरवलेल्या वेतनातून अर्धे वेतन चालकांना देऊन त्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण करीत आहेत. तसेच चार महिने वेतन देत नसल्याने चालकांची दिवाळी अंधारात जाणार आहे.
. चालकांना मागील चार महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावयाचा, हा प्रश्न येथे निर्माण झाला आहे. ग्रामीण रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका गाडीचा उपयोग आरटीपीसीआर सॅम्पल जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणे, व्हॅक्सिन आणणे, औषधे आणणे, ऑक्सिजन आणणे, व्हॅक्सिनेशन सेंटरवर व्हॅक्सिनची ने-आण व्हॅक्सिनची ने-आण करणे, गरोदर महिला रुग्णास तातडीने जिल्हा रुग्णालय मध्ये पोहचवणे, गरोदर, प्रसुती मातांना घरी नेण्यासाठी आदी स्वरूपाची सेवा येथील चालक 24 तास अविरत करीत असतात.
. मागील आर्थिक वर्षात सेल्फ इनोवेशन संस्था खामगांव यांना वाहन चालक यांचे कंत्राट दिले गेले होते परंतु या संस्थे ने सुद्धा जिल्हा परिषदेने निधी दिला नाही म्हणून मागील वर्षीचे वाहन चालकांचे 2 महिन्याचे वेतन व 12 महिन्याचे pf सुद्धा दिले नाही.त्या नंतर साई माऊली या कत्राटदारामार्फत १२२८२ रू वेतन देले जाते परंतु जिल्हा परिषद चंद्रपूर येथे निधी उपलब्ध असतांना सुध्दा कंत्राटदार यांना देण्यात आले नाही जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ‘१०२’क्रमांकाच्या रुग्णवाहिका आहेत. साई माऊली प्रा. लिमिटेड कंपनीकडून कंत्राटीपद्धतीवर जवळपास २७ चालक काम करीत आहेत. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे चालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला. आहे जिल्हा परिषद चंद्रपूर येथील वरीष्ठ अधिकारी यांना विचारले असता तुमचा आमचा काहीही संबंध नाही असे उत्तरे दिली जातात दिवाळीसारख्या सणाला बहीणीला आरती मध्ये एक रुपया टाकु शकणार नाही असे सुध्दा वाहन चालक यांचे म्हणणे आहे
. जून 2023 पासून ठेकेदार साई माऊली कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. तर चार महिन्यांत वेतन न दिल्याने उपासमारीची वेळ या 102 रुग्ण वाहिनीच्या चालकांवर आली आहे. जर हे कंत्राटदार अशा पद्धतीने चालकांचे शोषण करीत असतील व चार महिने वेतन देत नसतील तर ठेकेदार न नेमता राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत वेतन दिले जावे अशी मागणी चालक करीत आहेत.

