कोठारी ये तोहोगाव पंधरा किमी रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून संपूर्ण रस्त्याची वाट लागली आहे.खड्डे भरून रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून अनेकदा करण्यात आली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली नाही.या रस्त्यावर दुचाकी,चारचाकी व मोठ्या वाहनांचे अनेक अपघात घडले.यात अनेकजण जखमी झाले तर काहींना जीव गमवावा लागला.त्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली व खड्डे बुजविण्याचे काम ठेकेदारामार्फत सुरू झाले.याकामातही केवळ खड्डे बुजविण्याचा देखावा करण्यात येत आहे.
(छायाचित्र : धीरज बांबोडे, बल्लारपूर)

