Home विदर्भ चळवळीचा कार्यकर्ता मोहित खोब्रागडे यांचे दुःखद निधन

चळवळीचा कार्यकर्ता मोहित खोब्रागडे यांचे दुःखद निधन

1231

   समता सैनिक दलाच्या पथसंचालनात झाले अंत्यसंस्कार   

सिंदेवाही

.            धम्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा हा उदात्त हेतू मनाशी बाळगून धार्मिक चळवळीत स्वतःला वाहून घेणारे बौद्धाचार्य मोहित कृष्णा खोब्रागडे रा. विरव्हा यांचे वयाच्या ३१ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. रविवारी दुपारी ११ वाजता जिल्ह्यातील समता सनिक दलाच्या पथसंचालनात त्यांचेवर उमा नदी तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

.           मोहित हा शांत, आणि सुस्वभावी आणि कृतिशील युवक होता. घरी सडून मरण्यापेक्षा, चळवळीत काम करून मरणे बरे. कदाचित हा ध्यास मनाशी घेऊन तो भारतीय बौद्ध महासभेचा सदस्य होऊन श्रमणेर भिक्खू झाला. बौद्धाचार्य झाला, त्यानंतर समता सैनिक दलाचा सैनिक होऊन समाजाचे संरक्षण करण्याचे काम करीत असताना वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचा सक्रिय सदस्य होऊन चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. अचानक वयाच्या ३१ व्या वर्षी त्याचे दुःखद निधन झाले. रविवारी त्यांचेवर अंत्यसंस्कार करीत असताना समता सैनिक दल यांनी मानवंदना देऊन त्यांना पुष्पचक्र अर्पण केला. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.राजपाल खोब्रागडे, घनशाम भडके, अशोक रामटेके, जगदीश सेमस्कर, नागभीड तालुक्याचे उपाध्यक्ष अनिल मेश्राम, पोंभुर्णा तालुक्याचे निमसरकार, संजय गेडाम, मुल तालुक्याचे संदेश डोंगरे, बांबोळकर, चंद्रपूर पश्चिम चे ॲड. जगदिप खोब्रागडे, सिंदेवाही तालुक्याचे भैय्याजी निमगडे, विजय गेडाम, कोमल गेडाम, सावली तालुक्याचे लोमेश खोब्रागडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मुखरू बनसोड, महेंद्र कोवले, धनोज खोब्रागडे, इत्यादींनी मानवंदना देऊन आदरांजली वाहिली असंख्य जनसमुदाय आणि आप्तेष्टांच्या उपस्थिती अश्रूपूर्ण नयनांनी त्यांचेवर अग्नी संस्कार करण्यात आले..

error: Content is protected !!