शेतकऱ्यांत दहशत
नेरी
. नेरीवरून जवळ असलेल्या बोथली सिरपुर परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून जवळच असलेल्या पहाडीवर त्याचे बस्तान असल्याचे बोलले जात असून शेतात पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांना व धान कापणी करणाऱ्या महिलांना अनेकदा आढळला असून घातपाताची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा वनविभागाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
. या परिसरात अनेकदा प्राळीव प्राण्यावर बिबट्याने ताव मारला असून नेहमीच तो या परिसरात फिरत असतो सध्या धान कापणी तसेच पिकांना पाणी करण्याचा हंगाम सुरू झाल्याने जंगल व पहाडी परिसरातील शेतात बिबट्याची ग्रस्त सुरू असल्याने शेतकरी वर्गात दहशत निर्माण झाली आहे तसेच नागरिकांना सुद्धा रस्त्याने दर्शन दिल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तेव्हा संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.