Home सामाजिक वरोरा येथे भव्य विदर्भस्तरीय क्रिकेट सामने

वरोरा येथे भव्य विदर्भस्तरीय क्रिकेट सामने

1243

   विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर यांचा हस्ते उद्घाटन   

वरोरा

.          जय जिजाऊ क्रिकेट मंडळ वरोरा च्या वतीने जिजामाता वार्ड वरोरा येथील खेकारे लेआऊट मध्ये विदर्भस्तरीय हाप पिच टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले.

.          या विदर्भस्तरीय क्रिकेट सामन्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका पिंपळकर न.प.वरोरा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपाध्यक्ष अनिल झोटींग न.प.वरोरा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरोरा शहराध्यक्ष चंद्रकांत कुंभारे, जय जिजाऊ क्रिकेट मंडळ वरोराचे अध्यक्ष डॉ. नितीन पाटील हे होते. यावेळी मान्यवरांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून क्रिकेट पिच चे रितसर रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले.

.          मान्यवरांनी क्रिकेट खेळुन आनंद घेतला. तसेच पिंपळकर, विलास नेरकर, चंद्रकांत कुंभारे यांनी याप्रसंगी सर्व खेळाडूंना व जनसमुदायाला मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित मांडवकर यांनी केले. या प्रसंगी वार्डातील मंडळी व बाहेर गाव वरून आलेले क्रिकेट खेळाडू व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

error: Content is protected !!