आज ठरणार ग्रामपंचायत उमेदवारांचे भविष्य

33

जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायत ची आज मतमोजणी : सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष

चंद्रपूर

.         जिल्ह्यात रविवारी आठ गावांमध्ये ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक, तसेच सहा गावांमध्ये सहा सदस्यपदासाठी रविवारी पोटनिवडणूक पार पडली. आता उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून, आज, सोमवारी मतमोजणी होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, आपल्याच पक्षाची सत्ता राहावी यासाठी राजकीय नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

.         वरोरा तालुक्यातील सालोरी, अर्जुनी, सावली तालुक्यातील मोखाळा, राजुरा तालुक्यातील रामपूर, सास्ती व आर्वी,
जिवतीतील शेडवाही, लांबोरी, ब्रह्मपुरी तालुक्यातील काहाली या गावामध्येनिवडणूक पार पडली.

.         राजुरा तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या रामपूरमध्ये येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली. सरपंच पदासाठी थेट निवडणूक व अकरा सदस्य पदासाठी निवडणूक झाली. आठही ग्रामपंचायतमध्ये दुपारी ३:३० वाजेपर्यंत ५८.७१ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिमूर तालुक्यातील तीन गावांसह राजुरा, भद्रावती, सावली तालुक्यांतील प्रत्येकी एका गावामध्ये पोटनिवडणूक झाली.