Home विदर्भ तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा लॉंग मार्च

तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा लॉंग मार्च

1236

दुचाकी अपघात प्रकरण

नेरी

.          मद्यपी दुचाकी चालकाने एका शेतकऱ्याच्या बळी घेतल्याने संतप्त नागरिकांनी प्रेतच पोलीस चौकी ठेवल्याने गावात तणाव निर्माण झाला होता त्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज शंकरपूर येथे पोलिसांच्या वतीने लॉन्ग मार्च करण्यात आला.

.          मद्यपी चालकांनी शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर त्या आरोपीवर अटक करण्यात यावी व त्याचे वैद्यकीय तपासणी का करण्यात आली नाही या कारणामुळे संतप्त नागरिकांनी मृतदेह पोलीस चौकीत ठेवला होता जोपर्यंत दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत प्रेत उचलणार नसल्याचे पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतला होता याबाबत भिसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश राऊत यांनी शिष्टमंडळाची चर्चा केली. त्यानंतर चिमूर पोलीस उपविभागीय अधिकारी जाधव यांच्यासोबत शिस्त मंडळाने चर्चा केली त्या चर्चेत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल तसेच येथील पोलीस कर्मचार्‍याची बदली करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने संतप्त जमावाला शांत करण्यात आले.

.          अखेर प्रेत नातेवाईकांच्या सुपूर्त करण्यात आले व रात्रीच अंत्यविधी करण्यात आली परंतु या तणावात पोलीस चौकीची तोडफोड करण्यात आली तर पोलीस चौकी समोर ठेवण्यात आले पोलिसांचे वाहन तसेच जप्त करण्यात आलेल्या वाहनांची सुद्धा तोडफोड करण्यात आली यात जमावाकडून गोटमार झाल्याने पोलीस उपनिरीक्षक जंगम यांना किरकोळ मार लागला जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेला आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी सहायक पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांनी रात्रीच भेट दिली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शंकरपूर येथे लाँग मार्च करण्यात आला या लॉन्ग मार्च नेतृत्व पोलीस विभागीय अधिकारी जाधव ,भीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश राऊत ,चिमूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज गभने व पोलीस कर्मचारी या लांग मार्चमध्ये उपस्थित होते.

error: Content is protected !!