Home सामाजिक आनंदवन चौकावरी, जालिंदरचे मूंग पकोडे लई भारी

आनंदवन चौकावरी, जालिंदरचे मूंग पकोडे लई भारी

887

वरोरा येथील जालिंदरचे गरमागरम मूंग पकोडे परिसरात प्रसिद्ध.

सिंदेवाही 

.          रोजच्या दैनंदिन कामकाजाने माणूस खूपच व्यस्त झालेला असताना जर आवडी निवडीचे काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खाण्याची इच्छा झाली.

.          तर ते पदार्थ बनविण्यासाठी घरच्या महिलांना वेळ मिळत नाही. मात्र आता चवदार आणि चटकमटक खाण्यासाठी अल्पावधीत प्रसिद्ध असलेला जालिंदरचा मूंग पकोडा वरोरा शहरात सर्वांना खुणावतो आहे. वरोरा शहरातील आनंदवन चौकात अल्पावधीत प्रसिद्ध असलेले जालिंदरचे स्वाद मूंग पकोडा हे वरोरा वासियांनी जिभेची चव भागविण्याकरिता मोठी पर्वनीच साधली आहे. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून जालिंदर यांची वरोरा शहरात बरीच ओळख आहे. आनंदवन चौकात त्यांनी काही वर्षांपूर्वी एका ठेल्यावर मुंगाच्या डाळीचे चटपटीत आणि गरमागरम पकोडे बनवणे सुरू केले. त्यासोबत शेंगदाण्याची चटणी, आणि हिरव्या मिरचीचा तडका मारलेला ठेचा एकदम स्वादिष्ट आणि चव आणणारा पदार्थ ठरला असल्याने वरोरा आणि परिसरातील ग्रामीण भागात जालिंदरचा मूंग पकोडा अल्पावधीच प्रसिद्ध ठरला आहे. दुपारी २ वाजता पासून सुरू झालेले मूंग पकोडाचे दुकान रात्री ७ वाजता बंद होते. प्रसिद्ध असलेल्या जालिंदरच्या स्वाद मूंग पकोडा चे ग्राहक स्वतः पकोडे खाल्ल्यानंतर कुटुंबासाठी पार्सल नेल्याशिवाय राहत नाही. चंद्रपूर कडून नागपूर जाणारे, आणि येणारे प्रवाशी खास जालिंदरच्या मूंग पकोडयाची चव घेण्यासाठी आनंदवन चौकात थांबतात. अशी जालिंदरच्या मूंग पकोड्याची सर्वत्र प्रसिद्धी आहे.

error: Content is protected !!