Home विदर्भ *खासगीकरणाच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा

*खासगीकरणाच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा

861

हजारो विद्यार्थी सहभागी

चंद्रपूर 

.            खासगीकरणाच्या विरोधात शिक्षण व नोकरी बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश आज शुक्रवारला मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चात हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते. नोकर भरतीचे खासगीकरण, पेपरफुटी विरुद्ध कायदा, भरमसाठ परीक्षा शुल्क, कंत्राटी शिक्षक भरती, शाळांचे खासगीकरण व दत्तक देण्याचा घाट, समूह शाळा आदींच्या विरोधात तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली.

.           शिक्षण व नोकरी बचाव समितीच्या वतीने मोर्चाची सुरुवात चंद्रपूर दीक्षामूभी परिसरातून डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून मोर्चाची सुरूवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी कंत्राटी नोकर भरती शासन निर्णय तात्काळ रद्द करावा व सरकारी क्षेत्रातील खासगीकरण व कंत्राटीकरण बंद करण्यात यावे. वाढीव शुल्क रद्द करण्यात यावे.

.           नोकर भरतीचे खासगीकरण, पेपरफुटी विरुद्ध कायदा, भरमसाठ परीक्षा शुल्क, कंत्राटी शिक्षक भरती, शाळांचे खाजगीकरण व दत्तक देण्याचा घाट, समूह शाळा आदींच्या विरोधात आज चंद्रपूर येथे शिक्षण व नोकरी बचाव समितीने जन आक्रोश मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. विद्यार्थ्यांनी हातात फलक आणि घोषणाबाजी देत होते.

.           जन आक्रोश मोर्चात शिक्षण – नोकरी बचाव समिती जिल्हा चंद्रपूर चे सदस्य यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, विविध विभागातील शासकीय कर्मचारी, विविध शैक्षणिक, सामाजिक व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजीत वंजारी, आमदार प्रतिभा धनोरकर हे जन आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!