राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत खेळाडुंचे दमदार प्रदर्शन

39

वरोर्‍यात पहिल्यांदाच धनुर्विद्या स्पर्धा

राज्यभरातून ४३० खेळाडूंचा सहभाग

वरोरा

.           चंद्रपुर जिल्हा आर्चरी धनुर्विद्या असोसिएशन वरोरा च्या वतीने २० वी राज्यस्तरीय ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेत आयोजन ११ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर दरम्यान तालुका क्रीडा संकुल वरोरा येथे आयोजित करण्यात आले आहे . या स्पर्धेसाठी राज्यभरातून ४३० खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून या धनुर्विद्या स्पर्धेचे ११ ऑक्टोबरला मोठ्या थाटात उद्घाटन पार पडले.

.           वरोरा येथे तीन दिवशीय घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन तिरंदाजी महासंघाचे सचिन आणि चीन येथे भारतीय संघासोबत संघ प्रमुख म्हणून गेलेले प्रमोद चांदुरकर यांच्या हस्ते करण्यात आले . ही स्पर्धा इंडियन राऊंड, रिकव्हर राऊंड, कंपाऊंड राऊंड अशा एनआयटी वेगळ्या राऊंड मध्ये खेळली जात आहे . या स्पर्धेतून राष्ट्रीय स्तरासाठी महाराष्ट्रचा संघ निवडला जाणार आहे. व तो राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र चे प्रतिनिधित्व करणार आहे . याप्रसंगी राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झालेल्या क्षितिज चिमूरकर आणि क्रीडा स्पर्धमध्ये नेत्रदीपक मिळविलेल्या प्रमोद चांदुरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रपुर जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, मधुकर क्षीरसागर, अभिजीत दळवी, वरोरा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र चिकटे, धनुर्विद्या असोसिएशनचे सचिव महेश डोंगरे, उपाध्यक्ष हितेंद्र तेलंग सह आदी उपस्थित होते .