Home सामाजिक शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातर्फे फौंजी वारीयर्स टीमचा सत्कार

शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातर्फे फौंजी वारीयर्स टीमचा सत्कार

796

जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी केले अभिनंदन

चंद्रपुर

.          अमरावती येथील डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अमरावती जिल्हा आष्टेडु आखाडा असोसिएशन व डाॕ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय उत्तम नगर अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने १८ व्या राज्यस्तरीय आष्टेडु आखाडा स्पर्धा २०२३ चे दिनांक ३० सप्टेबर ते २ आॕक्टोबरला आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत वरोरा यांच्या फौजी वाॕरिअर्सच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केलेले आहे. यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिवसेना जिल्हा कार्यालय वरोरा येथे अभिनंदन केले व त्यांना मार्गदर्शन करणारे गुरू रवी चरूरकर यांचा शाल तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार केला.

.          याप्रसंगी रितिक धवणे, शंतनू धवणे, सानिया आवारी, पियुष विधाते, वेदिका भोयर, सोनू निखाडे, फकिरा निखाडे, पदमश्री झुरळे, सोनू दसूडे, वेदांत अतकळे या विद्यार्थांना त्यांच्या उज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

.          यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मनिष जेठानी, माजी सैनिक प्रवीण चिमूरकर, कृषि उत्त्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजू आसुटकर, शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, युवती सेना तालुका प्रमुख तेजस्विनी हनुवते, युवती सैनिक दिव्या चौधरी,समस्त शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!